

Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav announces financial assistance for Dilip Puri's family.
esakal
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील खातेगाव येथे कर्तव्यावर असताना पोलीस ठाण्याचे प्रभारी दिलीप पुरी यांचे निधन झाले. या घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी त्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच दिवंगत दिलीप पुरी यांच्या पत्नीला पोलीस उपनिरीक्षक (SI) पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे. या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.