हरयाणाचे माजी CM ओमप्रकाश चौटालांना चार वर्षांचा तुरुंगास

सिद्धूनंतर आता चौटाला! काँग्रेसच्या आणखी एका माजी मंत्र्याला तुरुंगवास
Omprakash Chautala
Omprakash Chautala

नवी दिल्ली : हरयाणाचे माजी मुख्यंमत्री ओमप्रकाश चौटाला यांना दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टानं ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कोर्टानं चोटाला यांना ही शिक्षा सुनावली. त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासासह ५० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर कोर्टानं त्यांच्या चार मालमत्ता जस्त करण्याचेही आदेश दिले आहेत. (Disproportionate assets case CBI Court sentences former Haryana CM OP Chautala to four years imprisonment)

याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु असताना चौटाला यांनी आपल्या जुन्या आजारपणाचं कारण देत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची कोर्टाला विनंती केली होती. दरम्यान, सीबीआयनं युक्तीवाद करताना म्हटलं होतं की, भ्रष्टाचार सामाजासाठी कॅन्सर समान आहे. भ्रष्टाचार प्रकरणी कोर्टाला अशी शिक्षा दिली पाहिजे जी समाजासाठी एक आदर्श ठरेल.

तुरुंगवास भोगावा लागणार

कोर्टानं चौटाला यांना तीन वर्षांहून अधिक कालावधीची शिक्षा सुनावली आहे त्यामुळं त्यांना तुरुंगवास भोगावा लागू शकतो. पण ते जामिनासाठी दिल्ली हायकोर्टात अर्ज करु शकतात जिथं त्यांना दिलासाही मिळू शकतो.

काय आहे प्रकरण?

सीबीआयकडून दाखल आरोपपत्रानुसार, चौटाला यांनी सन १९९३ आणि २००६ दरम्यान ६.०९ कोटी रुपयांची संपत्ती जमवली होती. ही संपत्ती त्यांच्या उत्पन्नाच्या व्यतिरिक्त अवैध मार्गानं गोळा करण्यात आली होती. मे २०१९ मध्ये ईडीनं ३.६ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्त केली होती.

चौटाला यांना जानेवारी २०१३ मध्ये जेबीटी घोटाळ्यात देखील दोषी ठरवण्यात आलं होतं. सन २००८ मध्ये चौटाला आणि ५३ इतर जणांवर १९९९ ते २००० पर्यंत हरयाणामध्ये ३,२०६ ज्युनिअर बेसिक प्रशिक्षित शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात आरोप झाले होते.

जानेवारी २०१३ मध्ये कोर्टानं ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचे पुत्र अजय सिंह चौटाला यांना भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत दहा वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. चौटाला यांच्यावर ३००० हून अधिक अपात्र शिक्षकांची बेकायदा पद्धतीनं भरती केल्याप्रकरणी दोषी ठरली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com