
कोरबा (छत्तीसगड) : कोरबा जिल्ह्यातील एका आईसक्रीम उत्पादन कारखान्यातील दोन कामगारांवर चोरीचा आरोप करत मालकाने अन् त्याच्या सहकाऱ्याने अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या पीडित कामगारांची नखे उपटण्यात आली, तसेच त्यांना विजेचे धक्केही (शॉक) देण्यात आले. याची ध्वनिचित्रफीतही समाजमाध्यमांवर पसरली आहे.