esakal | काँग्रेस नेते शिवकुमार यांना 'ईडी'कडून अटक 
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस नेते शिवकुमार यांना 'ईडी'कडून अटक 

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज अटक केली. गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी शिवकुमार हे आज चौथ्यांदा "ईडी'समोर हजर राहिले होते. चौकशीनंतर त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक झाली.

काँग्रेस नेते शिवकुमार यांना 'ईडी'कडून अटक 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज अटक केली. गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी शिवकुमार हे आज चौथ्यांदा "ईडी'समोर हजर राहिले होते. चौकशीनंतर त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक झाली.

 


शिवकुमार यांची कोठडीत चौकशी करणे आवश्‍यक असल्याने त्यांना अटक केल्याचे "ईडी'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवकुमार आणि दिल्लीतील कर्नाटक भवनमधील कर्मचारी हनुमंथैय्या यांच्याविरोधात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदविला होता. शिवकुमार यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले आहेत. 

loading image
go to top