Breaking : स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MK Stalin

अण्‍णा द्रमुकच्या मावळत्या मंत्र्यांनी त्यांची दालने रिकामी केली असून तेथे रंगरंगोटी आणि नव्या मंत्र्यांच्या नावांच्या पाट्या तयार करण्याचे काम सुरू आहे.

Breaking : स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

चेन्नई - तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत (Tamil Nadu Assembly Election) बहुमत मिळवल्यानंतर द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन (M.K.Stalin) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ (CM oath) घेतली. बुधवारी त्यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwarilal Purohit) यांची राजभवन येथे भेट घेऊन पक्षस्थापनेचा दावा केला होता. स्टॅलिन यांची मंगळवारी द्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती. स्टॅलिन यांना राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राजभवनामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा पार पडला. (DMK Chief MK Stalin takes oath as Chief Minister of Tamil Nadu)

हेही वाचा: अदृश्य शत्रूविरुद्धच्या लढाईत संरक्षण दल

नव्याने निवडून आलेल्या द्रमुकच्‍या १३३ आमदारांची यादी आणि पक्षनेतेपदी त्यांची एकमताने निवड केल्याचे पत्र पुरोहित यांना सादर करून स्टॅलिन यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना नवे सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले.

दरम्यान, नव्या सरकारच्या स्वागतासाठी फोर्ट सेंट जॉर्ज येथील सचिवालय सज्ज होत आहे. अण्‍णा द्रमुकच्या मावळत्या मंत्र्यांनी त्यांची दालने रिकामी केली असून तेथे रंगरंगोटी आणि नव्या मंत्र्यांच्या नावांच्या पाट्या तयार करण्याचे काम सुरू आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Web Title: Dmk Chief Mk Stalin Takes Oath As Chief Minister Of Tamil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top