esakal | तामिळनाडुत द्रमुकचे दमदार पुनरागमन; स्टॅलिन चालवणार करुणानिधींचा वारसा
sakal

बोलून बातमी शोधा

द्रमुकचे दमदार पुनरागमन; स्टॅलिन चालवणार करुणानिधींचा वारसा

या पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन प्रथमच मुख्यमंत्री बनतील आणि दिवंगत पिता एम. करुणानिधी यांचा वारसा पुढे चालवतील.

द्रमुकचे दमदार पुनरागमन; स्टॅलिन चालवणार करुणानिधींचा वारसा

sakal_logo
By
वॉल्टर स्कॉट

चेन्नई : तमिळनाडूत सत्तापालट होणार असून द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाने एक दशक विरोधी पक्ष राहिल्यानंतर अण्णाद्रमुकला शह देत पुनरागमन केले आहे. या पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन प्रथमच मुख्यमंत्री बनतील आणि दिवंगत पिता एम. करुणानिधी यांचा वारसा पुढे चालवतील.

तमिळनाडू राज्यात २३४ पैकी १२४ जागी द्रमुक आघाडीवर आहे. राज्यात भाजपने युती केलेल्या अण्णाद्रमुकला ७४ ठिकाणीच आघाडी मिळाली आहे. २० जागा लढविलेल्या भाजपच्या खात्यात केवळ तीन जागा मिळण्याची चिन्हे आहेत, तर २३ जागा लढविलेल्या पट्टाली मक्कल काचीला २३ पैकी सातच ठिकाणी आघाडी घेताआली आहे.

मी तुमच्याशी खरेपणाने वागेन. मी तुमच्यासाठी काम करेन. माझे विचार आणि कृती तमिळनाडूच्या लोकांसाठी असेल. पक्ष कार्यकर्ते, वरिष्ठ नेते, युतीचे नेते यांचा मी आभारी आहे.

- एम. के. स्टॅलिन, द्रमुक अध्यक्ष

दुसरीकडे द्रमुकने युती केलेल्या मित्र पक्षांतील काँग्रेसने १७, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रत्येकी दोन, तर विदुथलाई चिरुथैगल काची पक्षाने तीन ठिकाणी आघाडी घेतली आहे.द्रमुकने याआधी १९६७ ते ७१, ७१ ते ७६, ८९ ते ९१, ९६ ते २००१ आणि २००६ ते २०११ अशा पाच वेळा तमिळनाडूवर राज्य केले. यावेळी एक्झिट पोलमध्ये द्रमुक स्वबळावर सरकार स्थापन करेल असा कौल होता. स्पष्ट बहुमतासाठी ११८ जागांची गरज असताना द्रमुक हा टप्पा पार केला आहे. मित्र पक्षांमुळे द्रमुकचा दणदणीत विजय साकार होईल. द्रमुकचे करुणानिधी आणि अण्णाद्रमुकच्या जयललिता या नेत्यांच्या निधनानंतर राज्याने प्रथमच कौल दिला. त्यात स्टॅलिन यांच्या मेहनतीला फळ मिळाले. दरम्यान, अभिनेते कमल हसन यांना दक्षिण कोइमतूर मतदारसंघातून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

loading image