दौरा अर्धवट सोडून भारतात परतू नका; जेटलींच्या पुत्राची मोदींना विनंती

वृत्तसंस्था
रविवार, 25 ऑगस्ट 2019

 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. संयुक्त अरब अमिरातीला त्यांनी आज भेट दिली, त्याच वेळी अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त त्यांना समजले. त्यांनी फोनवरून त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. संयुक्त अरब अमिरातीला त्यांनी आज भेट दिली, त्याच वेळी अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त त्यांना समजले. त्यांनी फोनवरून त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

या वेळी जेटली यांचे पुत्र रोहन जेटली पंतप्रधानांना म्हणाले की, तुम्ही देशाच्या विकासाच्या उद्देशाने विदेश दौऱ्यावर गेला आहात. त्यामुळे आपला दौरा तुम्ही शक्‍यतो रद्द करू नका. देश सर्वांत पहिला असल्याने दौरा पूर्ण करूनच तुम्ही भारतात परत या, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not leave the tour in half and return to India request by Rahul Jaitley