Coronavirus : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र; म्हणाले...

वृत्तसंस्था
Tuesday, 3 March 2020

कोरोना मोठे संकट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, 'भारत सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. तुमचा सोशल मीडियावरील खेळ बंद करा. त्यावर उपाय करण्याचे बघा'.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान मोदींनी सोमवारी अचानक एक ट्विट केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, मंगळवारी नरेंद्र मोदींनी याबाबत पुन्हा एक ट्विट करुन नवा खुलासा केला आहे. मोदींच्या या ट्विटनंतर राहुल गांधींनी संताप व्यक्त केला आहे.

कोरोना मोठे संकट

राहुल गांधी म्हणाले, भारत सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. देशातील महत्वाच्या विषयांकडे लक्ष द्या. सध्या देशापुढे कोरोना व्हायरसचे सर्वात मोठे संकट आहे, त्यावर उपाय करण्याचे बघा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not Waste Time Playing Clown on Social Media and Deal With Coronavirus Rahul Gandhi Tells PM Narendra Modi