President Of India: राष्ट्रपतींच्या अंगरक्षक निवडीचा रंजक इतिहास तुम्हाला माहिती का?

काही निवडक लोकच भारताच्या राष्ट्रपतींचे (President Of India) रक्षक बनू शकतात.
President Of India
President Of IndiaEsakal

President Body Guard : राष्ट्रपतींचे अंगरक्षक बनण्यासाठी केवळ चांगल्या दर्जाची शरीरकाठीच असून चालत नाही तर विशेष वर्गात जन्म घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. राष्ट्रपती भवनाचा कोणता विशेष कार्यक्रम असो किंवा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले सैनिक तुम्ही पाहिले असतीलच. चमकदार प्रतिमा, गडद तेजस्वी रंगाचा पेहराव आणि भडक साफा घातलेले हे रक्षक सर्वांचे लक्ष वेधून घेतात. या रक्षकांच्या शरीररचनेप्रमाणेच त्यांचा निवडीचा इतिहासही अतिशय रंजक आहे.तुमच्या आमच्या सारखा कुणीही राष्ट्रपतींचा रक्षक होऊ शकत नाही, यासाठी विशेष वर्गातील लोकांची निवड केली जाते.

राष्ट्रपतींची सुरक्षा का महत्त्वाची आहे ?

भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आहेत, याशिवाय त्यांना कमांडर-इन-चीफचा दर्जाही आहे. राष्ट्रपती ते तिन्ही सैन्याचे प्रमुख देखील आहेत. अशा परिस्थितीत त्यांची सुरक्षा अधिक महत्त्वाची ठरते. राष्ट्रपतीच्या सुरक्षेची जबाबदारी प्रेसिडेंट बॉडीगार्ड म्हणजेच पीबीजीकडे देण्यात आली आहे.

PBG म्हणजे काय आणि कोण राष्ट्रपती गार्ड बनू शकतो?

प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड (PBG) ही भारतीय लष्करातील सर्वात वरिष्ठ घोडदळ रेजिमेंट आहे. हे भारतीय लष्कराचे सर्वात जुने युनिट आहे, ज्याचे मुख्य काम भारताच्या राष्ट्रपती पदावर असलेल्या व्यक्तीची सुरक्षा करणे हेच आहे. हे युनिट राष्ट्रपतींच्या अधिकृत कार्यक्रमांचा देखील एक अविभाज्य भाग आहे. येथे सामील असलेले सर्व सैनिक चांगल्या उंचीचे आहेत, घोडेस्वारीत त्यांचा कोणताही हात धरु शकत नाही. ते एक सक्षम टँक मॅन आणि पॅराट्रूपर्स देखील आहेत.

या रेजिमेंटची सुरुवात कशी झाली?

ही रेजिमेंट सुमारे 250 वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या काळात सुरू झाली होती. 1773 मध्ये, ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्सने त्याच्या संरक्षणासाठी 50 उत्कृष्ट घोडेस्वारांसह वाराणसीमध्ये त्याची सर्वप्रथम स्थापना केली होती. त्यावेळी वाराणसीचा राजा राजा चैतसिंग होते, त्यांनी आपल्या वतीने इंग्रज अधिकाऱ्याला आणखी 50 घोडेस्वार भेट दिले होते. या युनिटचा पहिला कमांडर ईस्ट इंडिया कंपनीचा कॅप्टन स्वीनी टून होता.

President Of India
भारतात गरीब स्वप्नंही पाहू शकतो अन् पूर्णही करु शकतो; शपथ घेताना राष्ट्रपती मुर्मू भावूक

राष्ट्रपती सुरक्षा अजूनही 100 घोडेस्वारच करतात का?

नाही. आता राष्ट्रपतींच्या रक्षकांची संख्या ही 100 वरुन 176 वर गेली आहे. ज्यामध्ये 4 अधिकारी श्रेणी, 11 कनिष्ठ आयोग अधिकारी आणि 161 जवान आहेत.


जातीने केवळ राजपूत, जाट आणि शीख असलेले लोकच राष्ट्रपतींचे रक्षक आहेत.जेव्हा या रेजिमेंट सुरुवात झाली तेव्हा अशी पद्धत नव्हती. या रेजिमेंटच्या स्थापनेच्या वेळी केवळ अवधच्या मुघलांची भरती यात करण्यात आली होती, परंतु कालांतराने त्यात बदल होत गेले. आता फक्त राजपूत, जाट आणि शीख या घटकाचा भाग होऊ शकतात. त्यांचे काम केवळ राष्ट्रपतींचे रक्षण करणे आहे असे नाही तर अनेक प्रसंगी त्यांनी रणांगणात आपल्या शौर्यची बहादुरी देखील दाखवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com