Cyclone Biparjoy : रेड, ऑरेंज, यलो अलर्ट म्हणजे काय? हे रंग कसे ठरतात?

शासनामार्फत लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जारी करण्यात येणाऱ्या रेड, यलो आणि ग्रीन अलर्टचा नेमका अर्थ काय तुम्हाला माहितीये काय?
General Knowledge
General Knowledgeesakal

General Knowledge : बिपरजॉय चक्रीवादळ उग्र रुप धारण करण्याचा धोका संभवत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १५ जूनच्या आसपास हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. गुजरातच्या किनारपट्टीला या वादळाचा तडाखा बसू शकतो. त्याअनुशंगाने इथे अलर्ट जारी करण्यात आलाय. मात्र शासनामार्फत लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जारी करण्यात येणाऱ्या रेड, यलो आणि ग्रीन अलर्टचा नेमका अर्थ काय तुम्हाला माहितीये काय? अनेकांना याबाबत माहिती नाही. तेव्हा आज आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

रेड अलर्ट –

रेड अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टच्या काळात मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येते. रेड अलर्ट सर्वात धोकायदायक मानला जातो.

ऑरेंज अलर्ट

वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार ऑरेंज अलर्टच्या काळात घडू शकतात. गरज असेल तरच या काळात बाहेर पडायला हवे असे प्रशासनाकडून सांगण्यात येत असते किंवा ऑरेंज अलर्टचा तसा अर्थ असतो. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. ऑरेंज अलर्टच्या काळात परिस्थिती रेड अलर्टच्या तुलनेत कमी धोकादायक असते.

General Knowledge
General Knowledge : IAS ऑफिसरकडे असतात एवढ्या पॉवर्स अन् सुविधा

यलो अलर्ट

पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे नैसर्गिक संकट ओढावू शकते, अशी सुचना जारी करण्यासाठी प्रशासन यलो अलर्टचा आधार घेते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या तुलनेत यलो अलर्ट हा कमी धोकादायक मानला जातो. (Awareness)

General Knowledge
General Knowledge : पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या जीन्स पँटचा खिसा छोटा का असतो? कारण वाचून व्हाल थक्क

ग्रीन अलर्ट

नैसर्गिकदृष्ट्या कोणतेही संकट नाही, सर्व काही ठीक आहे हा सिग्नल लोकांना देण्यासाठी ग्रीन अलर्ट देण्यात येतो. नैसर्गिकदृष्ट्या या काळात कोणतेही संकट नसते. सर्वच अलर्टच्या तुलनेत ग्रीन अलर्टच्या काळात आपण सर्वाधिक सुरक्षित आहोत असे मानण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com