Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवसाविषयीच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती का ?

भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये कारगिलचे युद्ध झाले होते.
Kargil Vijay Diwas
Kargil Vijay Diwas Esakal

भारत आणि पाकिस्तान या दोन शेजाऱ्यांमधील वाद सगळ्या जगाला माहिती आहे. हा वाद मिटवण्यासाठी भारताने पाकिस्तान सोबत मैत्री करण्यिचा अनेकदा प्रयत्न केला, पण पाकिस्तानचे कांगावे आणि कुरापतींमुळे ही मैत्री होऊ शकलेली नाही. उलट, पाकिस्तानने काश्मीरवर आपला हक्क दाखवायला सुरुवात केली आणि नियंत्रण रेषेवर नापाक कारवाया करणं सुरू केलं यामुळे मग पुढे भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढतच गेला. आणि या तणावाच्या पार्श्वभूमीवर, कारगिल युध्द झाले.

आता काही दिवसांवर कारगिल विजय दिवस आला आहे (२६ जुलै) त्या निमित्ताने या युद्धाविषयीच्या दहा गोष्टी जाणून घेऊ या.

भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. 8 मे 1999 रोजी जेव्हा पाकिस्तानचे सैनिक आणि काश्मिरी अतिरेकी कारगिलच्या शिखरांवर दिसलेले असताना या युद्धाची सुरुवात झाली होती.

1) कारगिलमध्ये घुसखोरीची माहिती सर्वप्रथम ताशी नामग्याल नावाच्या एका स्थानिक मेंढपाळाने दिली, जे कारगिलातील बाल्टिक सेक्टरमध्ये आपल्या नवीन याकाचा शोध घेत होते. याकच्या शोध घेण्याच्या दरम्यान त्यांना संशयास्पद पाक सैनिक दिसून आले.

2) 3 मे रोजी प्रथमच भारतीय सैनिकांना गश्त करत असताना आढळले की काही लोकं तेथे हालचाल करीत आहे. प्रथमच द्रास, काकसार आणि मुश्कोह सेक्टर मध्ये पाकिस्तानी घुसखोरांना बघितले.

3) भारतीय सैन्याने 9 जून रोजी बाल्टिक क्षेत्राच्या 2 चौकीवर ताबा घेतला. त्यानंतर 13 जून रोजी द्रास सेक्टरमध्ये तोलोलिंगवर ताबा घेतला. आपल्या सैन्याने 29 जून रोजी दोन अन्य महत्त्वाच्या चौक्या 5060 आणि 5100 आणि वर ताबा मिळवून आपला झेंडा रोविला.

Kargil Vijay Diwas
Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देणारा खरा खुरा शेर शाह कोण होता ?

4) तेथील तापमान उणे 30 ते उणे 40 अंश सेल्सियस इतके असते. अशा वातावरणात आपले जिगरबाज जवान न डगमगता शत्रूशी मुकाबला करत होते. इतक्या उंचीवर कधीच कुठलंच युद्ध झाले नव्हते.

5) 11 तासाच्या लढानंतर पुन्हा एकदा टायगर हिल्स वर भारतीय सैन्याने ताबा घेतला, मग बटालिकातील जुबेर हिल देखील ताब्यात घेतली.

6) 1999 मध्ये कारगिल युद्धात आर्टिलरी तोफेमधून 2,50,000 गोळे आणि रॉकेट डागळे गेले. 300 पेक्षा जास्त तोफ आणि मोटार आणि रॉकेटलॉन्चर्स ने दररोज सुमारे 5,000 बॉम्बं डागण्यात आले.

Kargil Vijay Diwas
Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवसाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व काय आहे ?

7) 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने कारगिल युद्धाच्या वेळी राबविलेल्या 'ऑपरेशन विजय' ला यशस्वीरीत्या पार पाडून घुसखोरांच्या तावडीतून भारतभूमीला मुक्त केले.

8) कारगिलची उंची समुद्र तळापासून सुमारे 16,000 ते 18,000 फूट अशी आहे, अशामध्ये विमानांना उड्डाण करण्यासाठी सुमारे 20,000 फुटाच्या उंची वर उड्डाण करावी लागते.

9) कारगिल युद्धात मीराजसाठी निव्वळ 12 दिवसात लेजर गाईडेड बॉम्बं प्रणाली (लेजर मार्गदर्शित बॉम्बं प्रणाली) तयार करण्यात आली. भारतीय वायू सेनेत पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात मिग-27 आणि मिग-29 विमान वापरण्यात आले होते.

10) कारगिलच्या टेकड्यांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात सुमारे 2 लक्ष भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला यामध्ये सुमारे 527 सैनिक हुतात्मा झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com