'तो' व्हिडिओ माझ्याकडे आहे, असे सांगायचे अन्...

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

हॉस्पिटलमध्ये काम करण्यास असलेल्या महिलेवर एकाने बलात्कार करत व्हिडिओ तयार केला. पुढे 'तो' व्हिडिओ माझ्याकडे आहे सांगून बलात्कार करायचे.

जयपूर (राजस्थान): हॉस्पिटलमध्ये काम करण्यास असलेल्या महिलेवर एकाने बलात्कार करत व्हिडिओ तयार केला. संबंधित व्हिडिओ हॉस्पिटलबद्दलमधील कर्मचाऱयांना समजल्यानंतर तो व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगून बलात्कर करत, यामध्ये डॉक्टरचाही समावेश आहे.

विवाहीत पीडित महिलेवर तिघे जण एक वर्षापासून बलात्कार करत होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला बारमेर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये काम करत होती. रात्रपाळी असताना अशोक नावाच्या सहकाऱयाने ज्यूस प्यायला दिला. ज्यूस प्यायल्यानंतर गुंगी आल्यानंतर त्याने बलात्कार केला व व्हिडिओही काढला. पुढे तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार करत राहिला. काही महिन्यानंतर डॉ. सुरेंद्र याने बलात्काराचा व्हिडिओ माझ्याकडे असल्याचे सांगत रुग्णालयामध्ये बलात्कार केला. डॉक्टरच्या भावाला या व्हिडिओबद्दल माहिती समजली. त्यानेही व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला.

16 ऑगस्ट रोजी डॉ. सुरेंद्र याने धमकी दिली. यानंतर पीडित महिलेने कुटुंबाला याबाबत माहिती दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor hospital staff gangrape blackmail nurse with video for a year at rajasthan