डॉक्टर दाम्पत्य फिरायला निघालं, पतीची गोळी झाडून पत्नीसमोरच आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor Suicide

डॉक्टर दाम्पत्य फिरायला निघालं, पतीची गोळी झाडून पत्नीसमोरच आत्महत्या

नवी दिल्ली : डॉक्टरने कारमध्ये पत्नीसमोरच स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. दोघेही पती-पत्नी फिरण्यासाठी डेहराडून जात होते. डॉक्टरने वाटतेच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने पत्नीला देखील धक्का बसला आहे. डेहराडूनच्या (Dehradun) जवळपास ही घटना घडली.

हेही वाचा: छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

राकेश कुमार सिंह (५६), असे या डॉक्टरचे नाव आहे. ते शामलीतील बुढाणा रस्त्यावर खासगी रुग्णालय चालवत होते. तसेच ते इनएटी सर्जन होते. त्यांची पत्नी अलका देखील डॉक्टर आहे. दोघेही पती-पत्नी आठवड्यातील शेवटचे दिवस घालवण्यासाठी डेहराडूनला जात होते. फतेहपूर पोलिस ठाण्याजवळील रेस्तराँजवळ गाडी पोहोचली. त्यावेळी अलका या गाडीतून उतरून वॉशरुमला गेल्या. त्यावेळी डॉक्टर गाडीतून उतरून बाहेर फिरत होते. पत्नी परत येताच दोघेही गाडीत बसले आणि पुन्हा प्रवास सुरू झाला. गाडी काही अंतरावर पोहोचल्यानंतर डॉक्टर पुन्हा गाडीतून उतरले आणि त्यांनी पत्नीसमोरच स्वतःवर गोळी झाडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पत्नी डॉ. अलकाची चौकशी केली. डेहराडूनला घर असल्यामुळे आठवड्यातील शेवटचे दिवस तिथे घालवण्यासाठी दोघेही निघाल्याचं त्यांनी सांगितलं. पण, डॉ. सिंह यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं ते रेस्तराँमध्ये थांबले. मी गाडी चालवत नाही, असं देखील त्यांनी म्हटलं. त्यानंतर डेहराडूनवरून भावाला बोलावण्यास सांगितलं. कुठल्या रुग्णाबद्दल काही अडचण आहे का? असं अलका यांनी डॉक्टर सिंह यांना विचारलं. पण, त्यांनी काहीही न ऐकता गोळी झाडली. काही वेळानंतर डॉ. सिंह यांचे मेहुणे देखील घटनास्थळी आले. त्यांची चौकशी केली असता काहीही आढळून आले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

Web Title: Doctor Suicided Shooting Himselfd In Front Of Wife At Dehradun

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crime
go to top