Nikhil Kamath: निखिल कामथ व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर्स खरेदीचा सल्ला देतात का? झिरोधा संस्थापकांनी सांगितलं सत्य

Nikhil Kamat: निखिल कामथ यांनी एक्स अकाउंटवर एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपबद्दलच्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत.
Nikhil Kamath
Nikhil Kamathesakal

Nikhil Kamat:

सोशल मीडिया घोटाळ्याचे हॉटस्पॉट बनले आहे. व्हॉट्सॲपवरील विविध प्रकारच्या फसवणुकींमध्ये, बनावट जाहिरातींशी संबंधित एक प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. अग्रगण्य स्टॉक ब्रोकर झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी वापरकर्त्यांना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.

निखिल कामथ यांनी  एक्स अकाउंटवर एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपबद्दलच्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. निखिल कामथ यांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे ज्यामध्ये ते काही विशिष्ट शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देतात, असा मेसेज व्हॉट्सॲपवर फिरत आहेत.

निखिल कामथने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, हा घोटाळा असून, ज्यांना असे मेसेज आले असतील त्यांनी त्याविरोधात तक्रार करावी. सोशल मीडियावर एक फोटोही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये निखिल कामथ त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत असल्याचे दाखवले जात आहे. निखिलनेही तो फोटो शेअर करत हा घोटाळा असल्याचे म्हटले आहे.

Nikhil Kamath
Investment Tips : शेअर्स, रियल इस्टेट सगळं काही बुडणार, सोन्या-चांदीतच गुंतवणूक करणे ठरेल योग्य; प्रसिद्ध लेखकाचा लाखमोलाचा सल्ला

असो कोणताही व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेला नाही. त्यांनी असेही म्हटले आहे की ते कधीही कोणताही स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत नाहीत. तसेच, ज्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे अशा सर्व ब्रँड्सना निखिल कामथ म्हणाले, ते सशुल्क प्रमोशन, सहयोग, जाहिरात, पेड स्पीकिंग असे कोणतेही काम करत नाहीत. तसेच अशा बाबींमध्ये सर्वांनी डोकं वापरण्याची सूचना कामथ यांनी केली आहे.

निखिल कामथ आणि नितीन कामथ हे भाऊ आणि झिरोधाचे सह-संस्थापक आहेत. 2010 मध्ये डिस्काउंट ब्रोकिंग प्लॅटफॉर्म Zerodha लाँच करण्यात आले. ऑनलाइन ब्रोकरेज प्लॅटफॉर्म Zerodha चे 1 कोटींहून अधिक क्लायंट आहेत, जे शेअर मार्केटमध्ये दररोज लाखो ऑर्डर देतात. तसंच नितीन कामथ यांनीही एक पोस्ट केली, कोविडनंतर आमची बाजारपेठ खूप मोठी झाली आहे. एका झिरोधा ग्राहकाकडे त्याच्या डीमॅट खात्यांमध्ये 4.5 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 

Nikhil Kamath
Arvind Kejriwal Arrest : केजरीवालांच्या याचिकेवर १५ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com