

Kuno's Cheeta Mitras Highlight Cheetah Conservation and Village Safety Measures
esakal
भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या दोन दिवसीय मध्य प्रदेश दौऱ्यात शेओपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कूनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. २२ जून रोजी झालेल्या या विशेष भेटीदरम्यान त्यांनी जंगलाच्या सीमावर्ती भागात वन्यजीव संरक्षणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या ‘चीता मित्रां’शी थेट संवाद साधला.
या वेळी राष्ट्रपतींनी कूनो राष्ट्रीय उद्यानातील चित्ता संवर्धनासाठी प्रशासन आणि स्थानिक पातळीवर राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली.