esakal | विद्यार्थ्यांना लस मिळेपर्यंत परीक्षा घेऊ नका - अखिलेश
sakal

बोलून बातमी शोधा

Akhilesh Yadav

विद्यार्थ्यांना लस मिळेपर्यंत परीक्षा घेऊ नका - अखिलेश

sakal_logo
By
पीटीआय

लखनौ - राज्यातील मुलांना (Child) जोपर्यंत लस (Vaccine) मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही परीक्षेचे (Exam) आयोजन करु नये, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी केली. ट्विटरवर (Twitter) त्यांनी म्हटले की, उत्तर प्रदेश शिक्षण मंडळाने संबंधित विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच परीक्षेचे आयोजन करावे. (Dont take Exams Until Students Get Vaccinated Akhilesh Yadav)

अखिलेश यादव यांनी यापूर्वीही योगी आदित्यनाथ सरकारकडे यूपी शिक्षण मंडळाच्या सर्व परीक्षार्थीना लस द्यावी, अशी मागणी केली होती. यादरम्यान समाजवादी पक्षाचे आमदार उदयवीर सिंह यांनी देखील कोणाचेही नाव न घेता म्हटले की, आपल्याला मुलं नसली तरी काय झाले, इतरांची चिंता समजून घ्या. अगोदर लस द्यावी, मगच परीक्षा ठेवावी. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी भारत सरकारने खेळू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सिंह म्हणाले, की समाजवादी पक्षासाठी व्यक्ती आणि त्याचे कुटुंब याची सुरक्षा पाहणे महत्त्वाचे आहे. समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास विद्यार्थ्यांना आणि युवकांना लस दिली जाईल आणि नंतरच शिपरीक्षेचे आयोजन होईल.

दरम्यान, कोविडच्या दुसऱ्या लाटेने स्थगित झालेल्या बारावीच्या परीक्षेवरुन अद्याप निर्णय झालेला नाही.