"आई-बाप काढायचे नाहीत", केंद्रीय मंत्र्यावर सुप्रिया सुळे भडकल्या!

लोकसभेत चर्चा सुरु असतानाच झाली तु-तू, मै-मै
Supriya Sule
Supriya Sule
Updated on

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बजेटवरुन (Jammu-Kashmir Budget) लोकसभेत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांच्यावर चांगल्याच भडकलेल्या पहायला मिळाल्या. "आई-बाप काढायचे नाहीत" अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सिंह यांना सुनावलं. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. (dont talk on my Father Mother Supriya Sule lashes out at Union Minister Jitendra Singh)

जम्मू-काश्मीरच्या बजेटवर मंगळवारी लोकसभेत चर्चा सुरु होती. यावेळी सुरुवातीला केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी काश्मिरी पंडितांचा मुद्दा मांडला होता. त्यांच्या या मुद्द्याला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं. सुळे म्हणाल्या, जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन वाढीसाठी गेल्या सात वर्षात तुम्ही काय सुविधा केल्या. पर्यटकांसाठी तिथं किती हॉटेल्स बांधली. इथल्या शैक्षणिक स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. काश्मिरी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूलला केंद्र सरकारकडून त्रास दिला जातोय.

Supriya Sule
'तर अशा शाळांची मान्यता रद्द होणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

दरम्यान, एका जुन्या भाषणाच्या संदर्भानं प्रश्न विचारणाऱ्या सुप्रिया सुळेंना जितेंद्र सिंह यांनी जागेवरुन उठून उत्तर देताना तुमच्या आई-वडिलांमुळं तुम्ही संसदेत येण्याइतक्या सक्षम झालात असं म्हटलं. पण हा मुद्दा घराणेशाहीकडं जाणारा असल्याचं लक्षात येताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी घराणेशाहीवर कधीच टीका केलेली नाही. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झालेल्या तुम्हाला चालतो मग राजकारणात का नाही? अशा अर्थानं त्यांनी जितेंद्र सिंह यांना प्रश्न विचारला. तसेच आई-वडिलांवरुन काही बोलायच नाही, अशा शब्दांत त्यांनी जितेंद्र सिंह यांच्या विधानावर आक्षेप घेत त्यांना सुनावलं.

Supriya Sule
दरेकरांना दिलासा देण्यास HC चा नकार; अटकेची टांगती तलवार?

सुप्रिया सुळे चिडलेल्या लक्षात आल्यानंतर जितेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानाचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, वारसा विसरता येत नाही, असं मी म्हणालो. मी तुमच्यावर वैयक्तिक भाष्य केलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com