Bjp Leader | माझ्या शरीराला स्पर्श करू नका. मी पुरुष...भाजप नेत्याचे विधान चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dont Touch My Body You Are Lady I Am Male Bjp Leader Suvendu Adhikari Viral Video

Bjp Leader : माझ्या शरीराला स्पर्श करू नका. मी पुरुष...भाजप नेत्याचे विधान चर्चेत

सोशल मीडियावर भाजप नेत्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. पश्चिम बंगालचे भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी कोलकाता येथे ‘नबन्ना चलो’निषेध मोर्चाचं आयोजन करून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यादरम्यान, त्यांनी केलेलं विधान सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (Dont Touch My Body You Are Lady I Am Male Bjp Leader Suvendu Adhikari Viral Video )

भाजपा नेते सुवेंदू अधिकारी एका विधानामुळे सोशल मीडियात ट्रोल होत आहेत. टीएमसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट सुवेंदू यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ''भाजपाच्या ५६ इंच छातीच्या मॉडेलचा भंडाफोड, भाजपाची नवी घोषणा: माझ्या शरीराला स्पर्श करू नका. मी पुरुष आहे.” असं कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मंगळवारी निषेध मोर्चादरम्यान सुवेंदू अधिकारी यांना एक महिला पोलीस अधिकारी अटक करत होती. यावेळी अटकेचा प्रतिकार करताना सुवेंदू अधिकारी यांनी “माझ्या शरीराला हात लावू नको, तू एक स्त्री आहेस आणि मी एक पुरुष आहे” असं विधान केलं आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

यासर्व प्रकरणावर सुवेंदू यांनी स्पष्टीकरणदेखील दिले आहे. 'मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. केवळ पुरुष पोलीस अधिकारी बोलवण्यासाठी आपण ते विधान केलं.' असे त्यांनी म्हटले आहे.

कोलकाता पोलिसांनी पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांना ‘नबन्ना चलो’ मोर्चादरम्यान ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व नेत्यांना लालबाजार येथील पोलीस मुख्यालयात नेण्यात आलं आहे.

Web Title: Dont Touch My Body You Are Lady I Am Male Bjp Leader Suvendu Adhikari Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpTMCviral video