esakal | राम मंदिरासाठीचं क्राऊड फंडिंग बंद; ट्रस्टने घेतला महत्वाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Ramtemplemodel

घरोघरी जाऊन देणगी स्विकारण्याच्या मोहिमेत गैरप्रकार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर ही मोहिम बंद करण्याचा महत्वाचा निर्णय राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने घेतला आहे.

राम मंदिरासाठीचं क्राऊड फंडिंग बंद; ट्रस्टने घेतला महत्वाचा निर्णय

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचं काम प्रगतीपथावर असून यासाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून घरोघरी जाऊन जनतेकडून देणगी गोळा (क्राउड फंडिंग) केली जात आहे. मात्र, घरोघरी जाऊन देणगी स्विकारण्याच्या मोहिमेत गैरप्रकार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर ही मोहिम बंद करण्याचा महत्वाचा निर्णय राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने घेतला आहे. मात्र, ज्यांना देणगी देण्याची इच्छा आहे त्यांना ट्रस्टच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने देणगी देता येणार आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही माहिती दिली. 

मंदिर तीन वर्षात होणार बांधून

चंपत राय म्हणाले, "घरोघरी जाऊन देणगी गोळा करणं आता थांबवण्यात आलं आहे. लोकांना आता ऑनलाईन स्वरुपात ट्रस्टच्या वेबसाईटवर जाऊन देणगी देता येणार आहे. मंदिरासमोर मैदान तयार करण्यासाठी जागा मिळवण्याबाबतही आमची चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप काही निश्चित झालेलं नाही." दरम्यान, राम मंदिर हे तीन वर्षात बांधून तयार होईल, असंही राय यांनी सांगितलं.  

आत्तापर्यंत इतका निधी झाला जमा

दरम्यान, बँकेच्या पावत्यांच्या आधारे समोर आलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारीपर्यंत अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी २५,००० मिलियन रुपये (२,५०० कोटी रुपये) देणगी मोहिमेतून जमा झाले आहेत, विश्व हिंदू परिषदेनं ही माहिती दिली आहे.  

बाबरी मशीद की राम मंदिर या गर्तेत अडकलेल्या अयोध्येतील वादग्रस्त जमिनीवर सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी ऐतिहासिक निकाल दिल्याने येथे राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. तसेच राम मंदिराच्या उभारणीसाठी स्वतंत्र राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची निर्मिती करण्यात आली. या ट्र्स्ट अतंर्गत राम मंदिराच्या उभारणीसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने सध्या देणगी मोहिम राबवण्यात येत आहे. 
 

loading image