ola uber cabsakal
देश
Ola Uber Cab : कॅबसाठी गर्दीच्या वेळी पडणार दुप्पट भाडे; परिवहन मंत्रालयाकडून परवानगी
गर्दीच्या वेळी कॅब सेवा पुरवठादार कंपन्यांना मूळ भाड्याच्या दुप्पट भाडे आकारण्याची दिली परवानगी.
नवी दिल्ली - ओला, उबर, रॅपीडो यासारख्या ‘ॲप’वर आधारित टॅक्सी/कॅब सेवा पुरवठादार कंपन्यांना गर्दीच्या वेळी प्रवाशांकडून मूळ भाड्याच्या दुप्पट भाडे आकारण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. याआधी या कंपन्यांना दीडपट भाडे आकारण्याची मुभा होती.