esakal | कोरोना चाचणी करावी लागू नये म्हणून रेल्वे स्थानकाबाहेर लोकांची पळापळ
sakal

बोलून बातमी शोधा

baxar railway station

कोरोना चाचणी करावी लागू नये म्हणून रेल्वे स्थानकाबाहेर लोकांची पळापळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

एकीकडे देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना दुसरीकडे पुन्हा एकदा शहरांतून गावाकडे जाणाऱ्या मजुरांचा, कामगारांचा ओघ वाढला आहे. बिहारच्या बक्सर रेल्वे स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अनेकजण रेल्वे स्थानकातून बाहेर पळताना दिसत आहेत. रेल्वे स्थानकावरील या गर्दीचं कारण आहे कोविड टेस्ट. रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर कोरोनाची चाचणी करावी लागू नये म्हणून ते स्थानकाबाहेर पळून जात आहेत.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतीच घोषणा केली होती की, बिहारमधल्या सर्व रेल्वे स्थानकांवर कोरोना चाचणीची व्यवस्था करण्यात यावी. देशातील विविध भागांतून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी व्हावी, यासाठी हा नियम लागू करण्यात आला होता.

कोरोना चाचणी न करताच प्रवाशांनी स्थानकावरून पळ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर बक्सरचे स्थानिक नगरसेवक जय तिवारी म्हणाले, "प्रवाशांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बाचाबाची सुरू केली. त्यावेळी स्थानकावर अतिरिक्त पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे परिस्थितीला हाताळणं कठीण झालं." बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोविड १९ संबंधित उच्चस्तरीय बैठकीत दुसऱ्या राज्यांमध्ये राहणाऱ्या बिहारच्या लोकांना परत यायचे असल्यास त्यांनी खुशाल यावे, असं म्हटलं होतं.

"जे लोक बिहारच्या बाहेर दुसऱ्या राज्यांमध्ये राहत आहेत, त्यांना बिहारमध्ये परत यायचं असल्याचं त्यांनी नक्कीच परतावं. मात्र रेल्वे स्थानकांवर कोरोनाची चाचणी करावी. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी", असं नितीश कुमार म्हणाले.

loading image