डॉ. बाबासाहेब आंबेडकरही 'कलम 370'च्या विरोधात होते; पण...

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

कलम 370 हे गेली 70-72 वर्षं देशाच्या राजकारणात, समाजकारणात चर्चेचा, वादाचा विषय ठरलं आहे.  घटनाकार बाबासाहेब आंबेडकरही या कलमाच्या विरोधात होते. या कलमावर अनेक निवडणुकाही लढवल्या गेल्या. अगदी ताज्या 2019च्या लोकसभा निवडणुकीतही 'कलम 370' हटवण्याचं आश्वासन भाजपाने दिलं होतं.

पुणे :  कलम 370 हे गेली 70-72 वर्षं देशाच्या राजकारणात, समाजकारणात चर्चेचा, वादाचा विषय ठरलं आहे.  घटनाकार बाबासाहेब आंबेडकरही या कलमाच्या विरोधात होते. या कलमावर अनेक निवडणुकाही लढवल्या गेल्या. अगदी ताज्या 2019च्या लोकसभा निवडणुकीतही 'कलम 370' हटवण्याचं आश्वासन भाजपाने दिलं होतं.

कलम 370 हे राज्यघटनेत समाविष्ट करण्याबाबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फारसे सकारात्मक नव्हते असे सांगण्यात येते, इतकंच नाही तर, कलम 370 भविष्यात हटवलं जाईल, अशी भविष्यवाणी खुद्द पंडित जवाहरलाल नेहरुंनी केली असल्याचेही  सांगण्यात आलं होतं. वास्तविक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा या कलमाला, जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याला विरोध होता. इतका की, त्यांनी हे कलम ड्राफ्ट करायलाही विरोध केल्याचं सांगितलं जातं. परंतु, काश्मीर भारताला जोडणं महत्त्वाचं असल्यानं नेहरुंनी राजा हरी सिंह यांच्या अटी मान्य केल्या.

डॉ. आंबेडकरांनी नकार दिल्यानंतर नेहरुंनी अय्यंगार यांच्याकरवी हा ड्राफ्ट तयार करून घेतला. त्यावेळीही हे कलम तात्पुरत्या स्वरूपात घटनेत समाविष्ट आलं होतं, अशी माहिती घटनेच्या अभ्यासकांनी दिली. तत्कालीन उपपंतप्रधान सरदार पटेल या कलमाबद्दल सकारात्मक नव्हते असेही सांगण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Babasaheb Ambedkar was not in favour of Article 370