Krishnaswamy Kasturirangan : ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष कस्तुरीरंगन यांचे निधन
ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे प्रदीर्घ आजाराने बंगळूरमध्ये निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पार्थिव रमन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ठेवले जाणार आहे.
नवी दिल्ली, बंगळूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन (वय ८४) यांचे शुक्रवारी बंगळूरमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून वृद्धत्वाशी संबंधित तक्रारींचा ते सामना करत होते.