esakal | प्रियांका गांधींच्या मदतीने डॉ खान राजस्थानात; योगी सरकारवर गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka-kafeel-khan

प्रियंका गांधी यांनी डॉ. खान यांना राजस्थानमध्ये राहण्याचा सल्ला दिला आणि सुरक्षित वास्तव्याचे आश्वासनही दिले होते.उत्तर प्रदेशातील राज्य सरकारच्या एकाधिकारशाहीवर टिकाही केली होती.

प्रियांका गांधींच्या मदतीने डॉ खान राजस्थानात; योगी सरकारवर गंभीर आरोप

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपुर- 2020 च्या सुरुवातीला भारतात 'नागरिकत्व दुरुस्ती कायद्या'वर (Citizenship (Amendment) Act, 2019) डिसेंबर महिन्यात संसदेत मंजूर झालं होतं. त्यावरून भारतभर मोठा वाद उफाळला होता. उत्तरीय राज्यात बऱ्याच ठिकाणी दंगलीही झाल्या होत्या. त्यादरम्यानच अलिगढ मुस्लिम विद्यापीठात (Aligarh Muslim University) डॉ. कफील खान यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर भाषण दिलं होतं. यामुळे उत्तरप्रदेश  पोलिसांनी (uttar pradesh police) डॉ खान यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (National Security Act) 29 जानेवारी 2020ला अटक केली होती. आता उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील सिध्द न झाल्याने खान यांना मंगळवारी सोडलं आहे. त्यानंतर लगेचच डॉ. कफील खान प्रियांका गांधी यांच्या मदतीने गुरुवारी जयपूर येथे वास्तव्यास आले आहेत. योगी सरकार डॉ. खान यांना आणखी कोणत्यातरी प्रकरणात दोषी ठरवून पुन्हा तुरूंगात टाकेन ही भीती खान यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना होती. 

अलिगढ मुस्लिम विद्यापीठात केलेल्या भाषणानंतर डॉ. काफील खान यांना उत्तर प्रदेश सरकारने निलंबित केलं होतं. 

कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी डॉ. खान यांना राजस्थानमध्ये राहण्याचा सल्ला दिला आणि सुरक्षित वास्तव्याचे आश्वासनही दिले होते. उत्तर प्रदेशातील राज्य सरकारच्या एकाधिकारशाहीवर टिकाही केली होती. गांधी यांच्या आवाहनानंतर डॉ. खान आता राजस्थानमध्ये आश्रयास गेले आहेत. 'आम्हाला प्रियंका गांधी यांनी जयपूरमध्ये सुरक्षित वास्तव्याचे आश्वासन दिलं होतं. सध्या आम्हाला राजस्थान येथे सुरक्षित वाटत आहे, असं डॉ. खान यांनी गुरुवारी जयपूरमधील पिंक सिटी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावर्षी जानेवारीत डॉ. खान यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर लेक्चर दिलं होतं. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आरोपाखाली उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केलं होतं. आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) त्यांचावर लावलेले आरोप रद्द् करत  डॉ. खान यांना सोडलं आहे. यावर्षीच्या सुरुवातीला 29 जानेवारीला डॉ खान यांना अटक करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमधील बालरोगतज्ज्ञांनी सांगितले की डॉ. खान यांनी त्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अपील करावे. मी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माझे निलंबन मागे घेऊन माझी सेवा परत द्यावी म्हणजे मी कोरोना योद्धा म्हणून काम करू शकेन. तसेच मला कोरोनवरील लस संशोधनावर काम  करायचा आहे, असे डॉ. खान म्हणाले आहेत. जर उत्तरप्रदेश सरकारने खान यांचं निलंबन मागे नाही घेतलं तर ते उच्च न्यायालयात जातील असा इशाराही राज्य सरकारला दिला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 डॉ खान यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मथुरा जिल्हा प्रशासनाने सुटका करण्यास विलंब केला होता. 'मथुरा कारागृह अधीक्षक म्हणाले होते की जिल्हाधिकाऱ्यांच्या (डीएम) आदेशाचे पालन करतील आणि डीएम लखनऊहून आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी मला सोडले त्याच दरम्यान ते माझ्यावर आणखी एखादा आरोप लावण्याची संधी शोधत होते' अशी प्रतिक्रिया डॉ. खान दिली आहे.