Kerala human sacrifice : जागतिकीकरण व संघामुळे नरबळी; डॉ. आर. बिंदू

केरळच्या महिला मंत्र्याचा अजब दावा
Dr R bindu statement Kerala human sacrifice due to globalization and some unions
Dr R bindu statement Kerala human sacrifice due to globalization and some unions sakal

तिरुअनंतपुरम : धनलाभासाठी दांपत्याने दोन महिलांचा बळी दिल्याची घटना केरळमधील पठणमतिठ्ठा जिल्ह्यात नुकतीच घडली. नरबळीची ही घटना जागतिकीकरण आणि काही कट्टरवादी शक्तींमुळे झाली असल्याचा अजब दावा केरळच्या सामाजिक न्याय मंत्री डॉ. आर. बिंदू यांनी केला आहे. काही कट्टरवादी शक्तींही नरबळीसारख्या घटनांना कारण ठरत आहेत. पोकळ आणि कालबाह्य मूल्‍य संस्कृती पुन्हा रुजविण्याचे प्रयत्न अशा शक्ती करीत आहे. असे त्यांनी सांगितले. त्यांचा रोख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे, असे विचारले असता डॉ. बिंदू यांनी त्याला दुजोरा दिला. ‘‘ते जे करीत आहेत, त्याचे पडसाद केरळसह प्रत्येक ठिकाणी जाणवतात. त्यात संशय आणि भीतीची जाणीव आपल्याला होते, असे त्या म्हणाल्या.

अंधश्रद्धाळू भारत

डॉ. आर. बिंदू म्हणाल्या, ‘‘भारतात अंधश्रद्धा खोलवर रुजलेल्या आहेत आणि त्याची मुळे अजून घट्ट होत आहेत. म्हणूनच अशा घटना केवळ केरळपुरत्या मर्यादित नाहीत तर पूर्ण भारतात हिंसा आणि क्रूरता वाढत आहे. त्यातील काही घटना केरळात पाहायला मिळतात.’’ संपूर्ण भारतात अशा घटना घटत असतात, असा दावा डॉ. बिंदू यांनी केला आहे. केरळमधील लोक जास्त सावध असल्याने येथील घटना उघडकीस आली. देशातील अन्य राज्यात अंधश्रद्धेला बळ देणाऱ्या अनेक प्रथा प्रचलित आहेत. त्यामुळे अशा घटना घडत असल्याची माहिती कोणालाही समजत नाही, असे त्या म्हणाल्या.

जागतिकीकरणातून निराशा

जागतिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या नैराश्यातूनही अशा घटना घडतात, असा आश्‍चर्यकारक दावाही या महिला मंत्र्याने केला. त्‍या म्हणाल्या, की जागतिकीकरणामुळे लोकांना पैसा कमाविण्याची आई झालेली आहे. अशावेळी नरबळी देऊन संपत्ती मिळविता येते, असे सांगत त्यांना सहज फसविता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com