esakal | आरोग्य- आनंदाचे कवच !
sakal

बोलून बातमी शोधा

Suraksha Kavach

आरोग्य- आनंदाचे कवच !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैद्यकीय क्षेत्र मी सुमारे चार दशकांपेक्षा जास्त अगदी जवळून बघितलं. नामवंत हॉस्पिटल्ससाठी काम करण्याची सुसंधी मिळाली, नावाजलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकवताना तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला, अनेक ध्येयवादी संस्थांसोबत, विविध क्षेत्रात मोलाचे सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींसोबत काम केलं, सातत्याने रुग्णांच्या संपर्कात राहिलो... या सर्वांच्या शुभेच्छा अन प्रेमामुळे नेत्रचिकित्सा आणि शस्त्रक्रियांचा विक्रम करू शकलो आणि पद्मश्री पुरस्काराचाही मानकरी होऊ शकलो! निवृत्तीनंतरही रुग्णांची नेत्रसेवा अविरत चालूच ठेवणार आहे...या कारकिर्दीत वैद्यकीय क्षेत्र अगदी जवळून अनुभवता आलं.

असंख्य सिनियर सिटीझन पेशंट्सची मोतीबिंदू आणि इतर नेत्ररोगांची ऑपरेशन्स केली. बदलती सामाजिक स्थिती, अर्थव्यवस्था यामुळे वैद्यकीय क्षेत्रातले संदर्भ दररोज बदलत आहेत. नवे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. नवनवी आव्हानेही येत आहेत. आज आपण कोरोनासारख्या साथरोगाचा सामना करीत आहोत. साऱ्या जगाला व्यापून टाकणाऱ्या या संकटाशी जिद्दीनं लढत आहोत...या पार्श्‍वभूमीवर मनाशी नोंदवलेली काही निरीक्षणे येथे मांडत आहे...

विविध आजार आणि ज्येष्ठ नागरिक

काळ बदलत गेला तसं आजारी पडल्यावर उपचार घेण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या. आता आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या ज्येष्ठांचा खासगी रुग्णालयाकडे कल असतो. इतर लोक सरकारी रुग्णालयात प्रथम जातात. या दोन्ही ठिकाणी पहिले आहे की जेमतेम १० टक्के लोक वैद्यकीय विमा उतरवलेले असतात. त्यांच्याकडे कुठलातरी हेल्थ इन्शुरन्स असतो. बाकीच्या ९० टक्के लोकांकडे अशा अनपेक्षित उदभवणाऱ्या आजारांसाठी कोणतेही आर्थिक नियोजन नसते. आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेकविध समस्यांची कल्पना आपण करू शकतो. हे चित्र बदलायला हवे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला भक्कम आर्थिक नियोजनाचा आधार द्यायला हवा. या पार्श्वभूमीवर सकाळ सह्याद्री सुरक्षा कवचने जो पायंडा पडला आहे, तो आदर्श आहे, अनुकरणीय आहे, असं मला वाटतं.

वृद्ध पालकांचा आधार बना

आज मी बघतो की कित्येक वृद्ध रुग्ण शस्त्रक्रियेकरता, उपचाराकरता एकटे येतात. साहजिकच वयाची साठ-सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तींची हॉस्पिटलमधील औपचारिकता पूर्ण करताना तारांबळ उडते. माझं तरुण मुलामुलींना असं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या व्यस्त दिनक्रमातून पालकांना वेळ देऊ शकत नसाल तर त्यांना सुरक्षा कवचसारख्या उपक्रमाचे सभासदत्व घेऊन द्या. शक्य होईल तेवढं त्यांचा आधार बना. नाहीतर त्यांचे प्रश्न सोपे करा...त्यांना सकाळ आणि सह्याद्री सारखा विश्वासार्ह आधार द्या.

आपल्याकडे ज्या वैद्यकीय विमा संरक्षणाच्या योजना आहेत त्यात अनेक त्रुटी आहेत. सर्वांत महत्त्वाची आणि त्रासदायक म्हणजे जुन्या आजारांना मिळणारे अपुरे संरक्षण. एक तर योजना घेतल्यानंतरच्या पहिल्या वर्षी तर अजिबातच कव्हर मिळत नाही. माझं मत असं आहे की विमा कंपन्या सर्व तपासण्या करतातच. मग त्याच्या आधारे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी ठरावीक प्रमाणात का होईना पण कव्हर द्यायला हवे आणि तेदेखील लगेच पहिल्या दिवसापासून...उलट या बाबतीत सुरक्षा कवचमध्ये तपासण्यांची सक्ती नाही आणि वयाचीही अट नाही, हे विशेष आहे! जसं ज्ञानेश्वरीत म्हंटलं आहे की मित्राशी त्याच्या सर्व दुर्गुणांसहीत मैत्री करा...त्याचे हे उत्तम उदाहरण आहे!

वृद्धांनी आनंदी म्हातारपण एन्जॉय करण्यासाठी स्वतःच्या तब्येतीची नियमित काळजी घ्यावी. आहार चांगला घ्यावा. रोजच्या रोज व्यायाम करावा. आपला मधुमेह आणि संधिवात नियंत्रणात ठेवावे. फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ठरावीक कालावधीनंतर न चुकता तपासण्या कराव्यात. स्वतः आनंदी राहावं आणि समवयीन मित्र-मैत्रिणीसोबत मजेत जगावं...सेकंड इनिंगच्या आरोग्याकडे बघण्याची चौकस आणि डोळस दृष्टी ठेवावी.

कोरोनाबाबत योग्य काळजी घ्या

ज्येष्ठांनी कोरोनाची लस घेताना कोणतीही अंधश्रद्धा बाळगू नये. अवश्य दोन्ही डोस घ्यावेत. योग्य ती काळजी घ्यावी. आणि अनाठायी भिती मनांत आणू नये. कोरोनावर मात केलेल्या वृद्धांची अनेक उदाहरणं आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी. आणि सुरक्षा कवच मध्ये कोरोनावरील तपासण्या आणि उपचारांची तरतूद आहेच की ! मग चिंता करण्याचे काहीच कारण नाही... होय ना?

या सुरक्षा कवच योजनेच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही जरूर संपर्क करा : ९८८१०९९०६२

- डॉ. तात्याराव लहाने

-----------------------------------------------------------------------------

खरंखुरं आरोग्य संरक्षण...

वैद्यकीय सेवा-सुविधांची खरी गरज पन्नाशी-साठी नंतरच्या ज्येष्ठ नागरिकांनाच लागते. माझा आजवरचा अनुभव असा आहे की साठीनंतर सर्वसाधारणपणे १० टक्के लोकांना वर्षातून एकदा रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासते, पण त्यापैकी सुमारे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना बाह्य रुग्ण विभागाची सेवा घ्यावी लागते. त्यासाठी खरंतर सगळ्याच सिनियर सिटिझन्सचा आरोग्य विमा असायला पाहिजे. पण वस्तुस्थिती अशी आहे की आजही फक्त २५ टक्के ते ३० टक्के वयस्कर आणि तेसुद्धा शहरी आणि सुशिक्षित, अशाच व्यक्तींकडे विमा संरक्षण असते. पुन्हा आपण भरमसाठ प्रिमियम भरून जो महागडा हेल्थ इन्शुरन्स घेतो त्याचा उपयोग केवळ हॉस्पिटलचे बिल भरण्याइतपतच होतो.

पण मग बाह्य रुग्ण म्हणजे ओपीडी सेवांचे काय? आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचे काय? आणि वेळोवेळी अवश्य करून घ्याव्यात अशा तपासण्यांचं काय? पण हा विचारच कुणी करत नाही. मग ह्यालाच इन्शुरन्स म्हणायचे का...? तर नाही! विविध दुर्धर आजार होऊच नयेत म्हणून नियमित व्यायाम, समतोल आहार, वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आवश्यक असेल तर तपासण्या करत राहाणं...हे खरे आरोग्य विमा संरक्षण! जे सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच गेली १४ वर्षं अव्याहतपणे हजारो ज्येष्ठांना देत आलं आहे. आणि त्यासोबतच दक्ष राहून दिली आहे सर्वोत्तम, जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवांची हमी...आपण आपल्या दुचाकींचा, टार चाकी वाहनांचा न

चुकता दर वर्षी विमा उतरवतो. मग आपल्याला मिळालेल्या या सर्वांगसुंदर अशा यंत्रासाठी ...म्हणजे शरीरासाठी आरोग्य कवच घ्यायला नको का? निश्चितच घ्यायला हवे...सर्व ज्येष्ठांनी आणि सर्व तरुण मंडळींनी त्यांच्या पालकांसाठी !

- डॉ. चारू आपटे

loading image