

India's eye at 21 km altitude; Successful flight of HAPS by DRDO
Sakal
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक ‘हाय अल्टीट्यूड प्लॅटफॉर्म’ची (HAPS) यशस्वी चाचणी घेऊन संरक्षण क्षेत्रात नवा मैलाचा दगड गाठला आहे. या प्रायोगिक उड्डाणादरम्यान या हवाई प्रणालीने समुद्रसपाटीपासून तब्बल २१ किलोमीटरची उंची गाठली. तसेच खाली उतरण्याचा संदेश मिळेपर्यंत ही प्रणाली २० किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर सलग ३० मिनिटांहून अधिक काळ हवेत स्थिर राहिली. चाचणीनंतर हे उपकरण जमिनीवर सुरक्षितरीत्या परत उतरवण्यात आले आहे.