Kurulkar Case : कुरूलकर परदेशी दौऱ्यात प्रत्यक्ष 'ती'ला भेटला, ब्लॅकमेल नव्हे स्वेच्छेनेच दिली माहिती…?

DRDO scientist Pradeep kurulkar may have shared critical info in person also DRDO espionage case
DRDO scientist Pradeep kurulkar may have shared critical info in person also DRDO espionage case

डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याच्या हनी-ट्रॅपिंग प्रकरणाचा तपास सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) करत आहे. या तपासात आत्तापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. दरम्यान कुरुलकर याने संवदेनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना पुरवल्याचा संशय एटीएसला आहे.

एटीएस अधिकारी कुरुलकरच्या अधिकृत परदेश दौऱ्यांची चोकशी करत आहे आणि त्यांना संशय आहे की तो पाकिस्तानी महिलेला भेटला असावा जी त्याच्याकडून व्हॉट्सअॅपद्वारे गुप्त माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत होती. या परदेशी दौऱ्यांवर असताना कुरुलकर ट्रेकिंगसारख्या अनेक गोष्टी केल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरडीओ कुरुलकर यांनी अलीकडेच त्यांच्या राजनैतिक पासपोर्टचा वापर करून चीन, दक्षिण आफ्रिका, केनिया, मॉरिशस, मलेशिया आणि नेपाळ या सहा देशांचे दौरे केले.

यापैकी एक-दोन प्रसंगी, त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत प्रवास केला आणि या बद्दल त्यांनी अधिकृत स्वरूपाबद्दल त्यांच्या विभागाला रीतसर माहिती दिली. मात्र एटीएसच्या तपासात कुरुलकर याने त्यांच्या अधिकृत प्रवासाचा भाग नसलेल्या काही गोष्टी देखील केल्या असल्याचे समोर आलं आहे. 'मिड डे'ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

DRDO scientist Pradeep kurulkar may have shared critical info in person also DRDO espionage case
Election News : काम बोलता है! लोकांनी चक्क मृत्यू झालेल्या महिलेला दिलं निवडून

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संशय निर्माण झाला आहे की तो ज्या महिलेशी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करत होता तिला तो भेटला असावा, कारण त्या महिलेशी कुरुकलकर मोठ्या प्रमाणात गुंतला होता. तसेच त्याने त्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, हा तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे आणि या भेटींबाबत तपशीलवार माहिती मिळणे बाकी आहे.

एटीएस अधिकाऱ्याने यावर भर दिला आहे की सध्यातरी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी प्रत्येक पैलूची कसून पडताळणी केली जात आहे. तसेच एटीएस सध्या कुरुलकरचा समावेश असलेल्या प्रकरणात हेरगिरीच्या शक्यतेचा तपास करत आहे. कारण एटीएसला त्यांच्या तपासात अढळून आले आही की कुरुलकरने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा (पीआयओ) शी संबंधित संशयित महिलेला तिने ब्लॅकमेल न करता स्वेच्छेने माहिती दिली.

त्यामुळे टप्प्यावर, आम्ही ही शक्यता नाकारू शकत नाही, कारण आम्ही ही माहितीची कन्फर्म करण्यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट्सची वाट पाहत आहोत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

DRDO scientist Pradeep kurulkar may have shared critical info in person also DRDO espionage case
Monsoon Update : यंदा मुंबईत 'या' तारखेला येणार मान्सून! उष्णतेपासून दिलासा कधी? तज्ज्ञांनी दिली माहिती

सोमवारी, एटीएसला फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून एक अहवाल प्राप्त झाला. या तज्ञांनीच कुरुलकरच्या मोबाईल फोनची तपासणी केली आहे. त्यांना असे दिसून आले की कुरुलकर ज्या डीआरडीओ प्रकल्पात सामील होता त्याशी संबंधित गोपनीय डेटा शेअर करण्यात आला होता. त्यामुळे कुरुळकरला पुणे सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याच्या कोठडीत आणखी एक दिवस वाढ करण्यात आली. पुढील चौकशीसाठी न्यायालयाने कोठडी आवश्यक असल्याचे मान्य केलं.

कुरुलकरचे वकील हृषिकेश गानू यांनी न्यायालयासमोर सांगितले की, एटीएस वारंवार अशाच कारणांवरून त्याच्या कोठडीची मागणी करत आहे आणि फेब्रुवारी महिन्यापासून त्यांच्याकडे त्यांचा फोन होता, त्यामुळे त्यांना हवे ते पुरावे घेऊन ते मांडू शकले असते.

कारवाईदरम्यान, न्यायालयाने या प्रकरणात जप्त केलेल्या आयफोनची विचारणा केली, जो दुसर्‍या व्यक्तीचा आहे आणि तो कुरुलकरशी कसा जोडला गेला याबद्दल विचारण्यात आले असता. तपास अधिकाऱ्याने स्पष्ट केले की हा फोन क्रीडा कोट्याअंतर्गत भरती झालेल्या भारतीय हवाई दलाशी संबंधित असलेल्या कॉर्पोरलचा होता. अधिकार्‍याने कोर्टरूममध्ये कॉर्पोरलचे नाव उघड केले आणि सांगितले की कुरुलकर ज्या महिलेशी संपर्कात होते तिच्याशी तिच्याशी संभाषण करताना तो देखील सापडला होता.

DRDO scientist Pradeep kurulkar may have shared critical info in person also DRDO espionage case
Shivsena : …माझा ३३वा नंबर होता; ठाकरेंसोबत गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले

खटल्यातील साक्षीदाराचे म्हणणे काय?

अधिका-यांनी पुढे नमूद केले की, या प्रकरणातील सध्या साक्षीदार असलेल्या कॉर्पोरलने संशयित पाकिस्तानी गुप्तहेरला भारतीय नंबरचा व्हॉट्सअॅप ओटीपी दिला होता, ज्याचा वापर नंतर कुरुलकरला मेसेज पाठवण्यासाठी केला गेला. नंतर त्यांनी कुरुलकर यांनी तिचा नंबर का ब्लॉक केला असे देखील विचारलं.

या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये कुरुलकरने त्या महिलेचा नंबर ब्लॉक केला होता. या महिलेने लंडनचा नंबर वापरून, जो की नंतर पाकिस्तानी आयपी अॅड्रेसशी जोडलेला असल्याचे आढळून आले आहे; त्यावरून एक प्रशंसक आणि सुंदर भारतीय मुलगी असल्याचे भासवून कुरुलकर यांच्याशी संपर्क साधला गेला.

तपास अधिका-यांनी पुढे सांगितले की, भारतीय क्रमांकाची तपासणी करताना, आम्हाला हवाई दलाच्या कॉर्पोरलशी कनेक्शन आढळले. जरी त्याने त्याच्या मर्यादित माहितीमुळे कोणतेही महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली असेल यावर आमचा विश्वास नाही.

फेसबुकवर त्या कॉर्पोरलने विमानाशी संबंधित फोटो पोस्ट केली होती, ज्यामुळे तो भारतीय वायुसेनेसाठी काम करत असल्याचे समजते. महिलेने त्याचे हेच प्रोफाइल लक्षात घेतल्यावर त्याच्याशी संपर्क साधला. दरम्यान सोमवारी अखेर या प्रकरणात न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत आणखी एक दिवस वाढ करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com