भारताच्या 'प्रलय'ची यशस्वी चाचणी; DRDO ची मोठी कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Missile

बुधवारी भारताच्या DRDO ने आणखी एका मिसाइलची यशस्वी चाचणी केली.

भारताच्या 'प्रलय'ची यशस्वी चाचणी; DRDO ची मोठी कामगिरी

भारताच्या (India) डीआरडीओने (DRDO) गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशाच्या (ODISHA) किनारपट्टीवर असलेल्या चाचणी केंद्रावरून डिसेंबरमध्ये अग्नी ५ सह अनेक बॅलेस्टिकसह क्रूज मिसाइलची चाचणी झाली. आता बुधवारी भारताच्या DRDO ने आणखी एका मिसाइलची यशस्वी चाचणी केली.

अब्दुल कलाम द्वीप (Abdul Kalam) इथून सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रलय (Pralay) नावाच्या मिसाइलची यशस्वी चाचणी कऱण्यात आली. यामुळे जमिनीवरून जमिनीवर हल्ला करण्याची क्षमता यामुळे वाढणार आहे. कमी अंतरावरचं हे मिसाइल जवळपास ५०० किलोमीटर पर्यंत मारा करू शकते. शिवाय १ हजार किलो वजनाचे स्फोटकं वाहून नेऊ शकते.

डीआरडीओने २०१५ च्या मार्च महिन्यात या मिसाइलबद्दल माहिती दिली होती. वार्षिक अहवालात बॅलेस्टिक मिसाइल प्रलय हे चीनच्या बॅलेस्टिक मिसाइलचा सामना करण्यास सक्षम असल्याचंही म्हटलं आहे. या मिसाइल हे अशा पद्धतीने तयार करण्यात आलं आहे ज्यामध्ये इतर लहान टप्प्याच्या बॅलेस्टिक मिसाइलच्या तुलनेत धोकादायक आहे. लक्ष्य अचूक साधण्यासह शत्रूला उद्ध्वस्त करण्याची ताकद यामध्ये आहे.

टॅग्स :IndiaDRDOMissile