बनावट दारू पिणे भोवले! नशेत नऊ जणांचा मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर

Death
Deathesakal

बिहार : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने राज्यात दारूचे सेवन (Drink Alcohol), उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. असे असतानाही राज्यात दारू तस्करी, मद्यपानाची प्रकरणे रोजच समोर येत आहेत. एवढेच नाही तर अनेक वेळा विषारी दारू प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीही लोकांचे दारू पिण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. अशीच विषारी दारू पिल्यानंतर नशेत नालंदा येथील नऊ जणांचा (drowned) बुडून मृत्यू झाला, तर तीन जणांवर गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, नालंदा जिल्ह्यातील सोहसराय पोलिस स्टेशन हद्दीतील छोटी पहारी आणि पहार तल्ली मोहल्ला येथे नऊ जणांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तर तीन जणांवर (All three are in critical condition) गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दारू पिऊन तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची बाब मृतांचे नातेवाईक करीत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, नालंदा जिल्ह्यातील सोहसराय पोलिस स्टेशन हद्दीतील छोटी पहारी आणि पहार तल्ली मोहल्ला येथे नऊ जणांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तर तीन जणांवर (All three are in critical condition) गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दारू पिऊन तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची बाब मृतांचे नातेवाईक करीत आहेत.

Death
नात्याला काळिमा! भाच्याने मित्रासोबत मामीवर केला सामूहिक बलात्कार

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनात खळबळ उडाली. एसएचओ सुरेश प्रसाद यांच्यानंतर सदरचे डीएसपी डॉ. शिबली नोमानी घटनास्थळी पोहोचून कुटुंबीयांकडून माहिती घेत आहेत. बनावट मद्य सेवनामुळे (Drink Alcohol) पाच जणांचा मृत्यू झाला याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, जवळच्या परिसरात दारू बनविण्याचेही स्थानिक लोक बोलत आहेत. त्याचवेळी मानपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हरगाव गावात दारू पिऊन दोघांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.

Death
नेते बघ्यांच्या भूमिकेत : लढ म्हणायला कोणीच नाही; शिवसैनिक अस्वस्थ

७ डिसेंबरला तिघांचा मृत्यू

यापूर्वी ७ डिसेंबर रोजी समस्तीपूरच्या हाथोरी पोलिस स्टेशन हद्दीतील बल्लीपूर गावात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. काही आजारी लोक लपून उपचार घेत होते. गावातच लग्न समारंभात सर्वांनी दारू प्यायली होती. मृत्युमुखी पडलेले तिघेही कामगार वर्गातील होते. पोलिसांना याची माहिती मिळू नये म्हणून कुटुंबीयांनी गुपचूप अंत्यसंस्कार केले होते.

मागच्या वर्षी सहा जणांचा मृत्यू

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुझफ्फरपूरमध्ये बनावट दारू प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाला होता. मुझफ्फरपूरच्या कांती ब्लॉकमध्ये सहा लोक आजारी पडले, तर मद्यपान केल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी एका व्यक्तीची दृष्टी गेली होती. पंचायत निवडणुकीच्या उमेदवाराने वाटलेली दारू सर्वांनीच प्यायली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com