Drishti 10 Starliner : भारतीय नौदलासाठी अदानींच्या कंपनीने बनवलं खास ड्रोन! काय आहेत फीचर्स?

नौदलाला आत्मनिर्भर करण्यासाठी आयएसआर टेक्नॉलॉजीने उचललेलं हे पाऊल अगदीच महत्वपूर्ण आहे. दृष्टी 10 हे ड्रोन ताफ्यात आल्यामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे.
Drishti 10 Starliner
Drishti 10 StarlinereSakal

Indian Navy Drishti 10 UAV : भारतीय नौदलाच्या ताफ्यात आता एक नवीन ड्रोन आलं आहे. दृष्टी 10 स्टारलाइनर असं या ड्रोनचं नाव आहे. नौदलाचे प्रमुख आर. हरी कुमार यांनी आज हैदराबादमध्ये याचं अनावरण केलं. या अनमॅन्ड एरिअल व्हीकलची (UAV) निर्मिती अदानी डिफेन्स अँड एअरोस्पेस या कंपनीने केली आहे.

या ड्रोनच्या फ्लॅग-ऑफ सोहळ्याला अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार हे प्रमुख अतिथी होते. यावेळी नौसेनेचे 75 सैनिक देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी भारतीय नौदलाचा पुढील रोडमॅप कसा असेल याचा उल्लेख केला. संरक्षणाच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर होत आहे. यासाठी अदानी ग्रुपचेही योगदान असल्याचं त्यांनी म्हटलं. (Drishti 10 Starliner)

कसं आहे हे ड्रोन?

  • दृष्टी 10 स्टारलाइनर हे मेड इन इंडिया यूएव्ही आहे.

  • यातील 60 टक्के सुटे भाग भारतात तयार झाले आहेत.

  • यामध्ये 450 किलोची पेलोड क्षमता आहे. म्हणजेच, 450 किलोचे सामान हे ड्रोन वाहून नेऊ शकते.

  • हे एक मानवरहित यूएव्ही आहे.

  • पाऊस, वादळ आणि कोणत्याही हवामानात हे उड्डाण भरू शकते.

  • हे 36 तासांपर्यंत हवेत राहू शकते.

  • कोणत्याही भागामध्ये उड्डाण करण्यासाठी हे ड्रोन सक्षम आहे.

Drishti 10 Starliner
रिलायन्स ही गुजराती कंपनी होती आणि भविष्यातही गुजराती कंपनी राहील; मुकेश अंबानींचे वक्तव्य चर्चेत

नौदलाला आत्मनिर्भर करण्यासाठी आयएसआर टेक्नॉलॉजीने उचललेलं हे पाऊल अगदीच महत्वपूर्ण आहे. दृष्टी 10 हे ड्रोन ताफ्यात आल्यामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. याचे 60 टक्क्यांहून अधिक सुटे भाग भारतातच तयार झाले आहेत. याला लवकरच सागरी मोहिमांमध्ये सहभागी करण्यात येईल. हैदराबादवरुन आता हे ड्रोन पोरबंदरकडे उड्डाण करेल, अशी माहिती यावेळी कुमार यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com