ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित कामं होणार ऑनलाईन; अधिसूचना जारी

ऑनलाइन सेवांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणापासून ते नोंदणी प्रमाणपत्रापर्यंत अनेक सेवा देण्यात आल्या आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित कामं होणार ऑनलाईन; अधिसूचना जारी

नवी दिल्ली : ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्या संबंधित अनेक सेवा कॉन्टॅक्टलेस करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आता हे काम करण्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नसून तुम्ही याच्याशी संबंधित अनेक सुविधांचा लाभ ऑनलाइन घेऊ शकणार आहात. याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गुरुवारी एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. (Driving License Work Now Done Online)

मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, मंत्रालयाने अनेक आरटीओ सेवा डिजीटल केल्या आहेत, जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया लोकांना कोणत्याही त्रासाशिवाय करता येईल आणि आरटीओ कार्यालयाची कार्यक्षमता देखील वाढेल. ऑनलाइन सेवांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणापासून ते नोंदणी प्रमाणपत्रापर्यंत अनेक सेवा देण्यात आल्या आहेत. आधार प्रमाणीकरण म्हणजेच आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कोणीही या सुविधांचा ऑनलाइन लाभ घेऊ शकेल असे मंत्रालयाने केलेल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे. या सेवांचा ऑनलाइन लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ड्रायव्हिंग लायसन्स आणि नोंदणीचे प्रमाणपत्र आधारशी लिंक करणे आवश्यक असणार आहे.

कोणत्या सेवा ऑनलाइन असतील?

या सेवांमध्ये लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण (ड्रायव्हिंग टेस्ट आवश्यक), डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्समध्ये पत्ता बदलणे आणि वाहनांची आरसी, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट, परवान्यातून वाहन वर्ग सरेंडर करणे, तात्पुरत्या वाहन नोंदणीसाठी अर्ज आदी सेवांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com