

Rare Wildlife Moment Captured in Dudhwa National Park
Sakal
उत्तर प्रदेश : निसर्गामध्ये आईचे प्रेम आणि तिची संरक्षणात्मक वृत्ती किती प्रबळ असते, याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील दुधवा नॅशनल पार्कमध्ये आला आहे. एका वाघाने गेंड्याच्या पिल्लावर शिकार करण्यासाठी दबा धरला होता, मात्र पिल्लाच्या आईने वेळीच धोका ओळखून साक्षात मृत्यूशी दोन हात करत वाघाला पळवून लावले. हा अंगावर शहारे आणणारा दुर्मिळ क्षण एका पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यात टिपला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://x.com/rameshpandeyifs/status/2005114900633563233