
नव्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून हे अनोखे आंदोलन शेतकऱ्यांनी आज केले.गेल्या३२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.कोरोनाच्या काळात थाळ्या वाजविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या मन की बात कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांनी थाळी वाजवून आपला निषेध व्यक्त केला.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नव्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून हे अनोखे आंदोलन शेतकऱ्यांनी आज केले. गेल्या ३२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. कोरोनाच्या काळात थाळ्या वाजविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. त्याचप्रमाणे थाळ्या वाजवून केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांना आम्ही पळवून लावणार आहोत, अशी प्रतिक्रिया भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
क्रांतिकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल म्हणाले, की पंजाब आणि हरियानातील टोल खुले करण्यात येतील. येत्या बुधवारी (ता. ३०) सिंघू सीमेवरून ट्रॅक्टर मार्च काढण्यात येईल. देशभरातील नागरिकांना येथे येऊन आमच्या समवेत नव्या वर्षांचे स्वागत करावे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा