esakal | कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या शिक्षिकेवर आली कचरा उचलण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या शिक्षिकेवर आली कचरा उचलण्याची वेळ

कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या शिक्षिकेवर आली कचरा उचलण्याची वेळ

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना संकटामुळे अनेकांचं आयुष्य उद्धवस्त झालं आहे. अनेकांनी आपल्या कुटुंबियांना गमावलं आहे. तर, असंख्य अद्यापही कोविड आणि पोस्ट कोविडच्या समस्येने त्रस्त आहेत. यामध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यात आला. परिणामी, आर्थिक संकट कोसळल्यामुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून प्रत्येक जण कठीण प्रसंगाला सामोरं जात आहे. यामध्येच एका शिक्षिकेवर चक्क कचरा उचलण्याची वेळ आली आहे. (during-the-corona-period-the-female-teacher-lost-her-school-job-compulsion-is-driving-the-municipal-garbage-vehicle)

ओडिशातील भुवनेश्वर (Bhubaneswar) येथे राहणाऱ्या एका शिक्षिकेवर सध्या घंटागाडी चालविण्याची वेळ आली आहे. भुवनेश्वर येथे राहणाऱ्या स्मृतिरेखा बेहरा या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. मात्र, कोरोना काळात नोकरी गेल्यामुळे त्या कचऱ्याची गाडी चालविण्याचं काम करत आहेत.

हेही वाचा: A रक्तगट असणाऱ्यांनी चुकूनही खाऊ नका नॉनव्हेज!

स्मृतिरेखा बेहरा या भुवनेश्वरमधील पथबंधा या भागात राहत असून घरखर्चासाठी त्या महानगरपालिकेची घंटागाडी चालविण्याचं काम करत आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा यासाठी त्यांनी हे काम स्वीकारल्याचं त्या म्हणाल्या.

"कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे माझ्या कुटुंबाला दोन वेळचं जेवणही नीट मिळालं नाही. मला दोन मुली आहेत. निदान त्यांना तरी जेवण मिळावं म्हणून मी लोकांकडून पैसे उधार मागितले. पण, हे फार दिवस नाही चाललं. या महामारीच्या काळात मी सगळ्यात वाईट दिवस पाहिले आहेत. सुरुवातीला मी घरीच मुलांची शिकवणी घेऊन घर चालवत होते. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे हे कामदेखील फार काळ टिकलं नाही. त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता", असं स्मृतिरेखा म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात," या काळात माझ्या पतीचा पगार येणंही बंद झालं होतं. त्यामुळे आम्ही प्रचंड आर्थिक संकटात सापडलो होतो. म्हणून मी घंटागाडी चालवण्याचा निर्णय घेतला."

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर स्मृतिरेखा यांची जोरदार चर्चा रंगली आहे. एक आई आपल्या मुलांसाठी काय करु शकते याचं उत्तम उदाहरण स्मृतिरेखा आहेत असं अनेक जण म्हणत आहेत. तर, कोरोना काळात नोकरी गमावलेल्या अनेकांनी त्यांची व्यथाही मांडली आहे.

loading image