PM मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव! 'त्या' पेंटिंगसाठी लागली 65 लाखांची बोली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव! 'त्या' पेंटिंगसाठी लागली 65 लाखांची बोली

PM मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव! 'त्या' पेंटिंगसाठी लागली 65 लाखांची बोली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावादरम्यान 'बनारस घाट'च्या पेंटिंगसाठी 65 लाखांची सर्वाधिक बोली लावण्यात आली आहे. चित्रकार परेश मैती यांनी ही पेंटिंग पंतप्रधानांना भेट दिली होती. दरम्यान लिलावात पेंटिंगची मूळ किंमत 64 लाख 80 हजर ठेवण्यात आली आहे. 2 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा लिलाव 31 ऑक्टोबरला संपणार आहे.

यावेळी सांस्कृतिक मंत्रालयाच्या ई-लिलावात 912 भेटवस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. हा ई-लिलाव पाचव्यांदा होत आहे. त्याची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. चार वर्षांत 7,000 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव झाला असून त्यातून 33 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. (Latest Marathi News)

यावेळचा सर्वात महागडा लिलाव बनारस घाटाच्या पेंटिंगचा आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये नीता अंबानी यांनी दिलेल्या भेट वस्तूचा देखील समावेश आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, "प्रत्येक वेळेप्रमाणे या वेळीही लिलावात मिळालेली रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला दिली जाईल."

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला होता. त्यानंतर तो पैसा 'बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेत वापरण्यात आला.