Ration Card : रेशन कार्डची E-KYC करणे बंधनकारक, अन्यथा मोफत रेशन सुविधा होणार रद्द, तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन
E-KYC of Ration Card : भारत सरकारने (India Government) गरिबांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा कायदा म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एनएफएसए).
बंगळूर : रेशन कार्डधारकांना ई-केवायसी (Ration Card E-KYC) करणे अनिवार्य आहे; अन्यथा मोफत रेशन सुविधा रद्द केली जाऊ शकते. तुमची ई-केवायसी स्थिती ऑनलाईन तपासा आणि जर पूर्ण झाली नाही, तर ती जवळच्या केंद्रावर त्वरित करा, असे आवाहन करण्यात आले आहे.