esakal | दिल्लीनंतर जम्मू काश्मीरसह गुजरातही हादरलं; एवढ्या तीव्रतेचा भूकंप
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake Hits Jammu And Kashmir With Gujrat 3rd In Three Days

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीला भूकंपाचे धक्के बसत असताना जम्मू-काश्मीर आणि गुजरातलाही भूकंपाचे धक्के बसले आहेत.

दिल्लीनंतर जम्मू काश्मीरसह गुजरातही हादरलं; एवढ्या तीव्रतेचा भूकंप

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीला भूकंपाचे धक्के बसत असताना जम्मू-काश्मीर आणि गुजरातलाही भूकंपाचे धक्के बसले आहेत. आज (ता. १६) सकाळी ताजिकिस्तानसह जवळच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत सकाळी ०७ वाजता आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी होती. भूकंपाचे केंद्रबिंदू ताजिकिस्तानमधील दसहांबेपासून ३४१ किमी अंतरावर होते. याचे धक्के जम्मू-काश्मीरपर्यंत जाणवले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के अनेक वेळा जाणवले आहेत. तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी पहाटे ४.३५ वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.२ होती. यापूर्वी ९ जून रोजी जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. ९ जून रोजी सकाळी ८.१६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर तीव्रता ३.९ होती. भूकंपाचे केंद्रस्थान श्रीनगरच्या १४ कि.मी. उत्तरेस आणि गांदरबेलच्या दक्षिण-पूर्वेस ७ कि.मी. अंतरावर होते. तत्पूर्वी, काल (ता. १५) सोमवारी गुजरातमध्येही भूकंपाचा धक्का बसला. दुपारी  १२.५७ वाजता कच्छ येथे भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर हा भूकंप ४.५ इतका तीव्रतेचा होता. भूकंपाचे केंद्रस्थळ कच्छपासून १५ किलोमीटर अंतरावर होते. यापूर्वी रविवारी कच्छ येथे ५.५ तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्यानंतर भीतीचे वातावरण होते. भूकंपाचे केंद्रबिंदू कच्छमधील भचाऊ जवळ दहा कि.मी. अंतरावर होते. या भूकंपानंतर कच्छमधील बर्‍याच घरांमध्ये तडे गेले होते.
--------
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; प्रशासनाने घेतला 'हा' निर्णय
---------
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागात भूंकपाचे सौम्य झटके बसत आहेत. गेल्या बुधवारी अंदमान आणि निकोबार द्वीप समूहावरील दिगलपूर येथेही भूकंपाचे झटके जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 नोंदवण्यात आली होती. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने याची माहिती दिली होती. या भूकंपाचे केंद्र दिगलपूरपासून ११० किलोमीटर अंतरावर उत्तर-पश्चिम दिशेला होते. या भूंकपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५ पेक्षा कमी होती. त्यामुळे कोणतेही मोठे संकट ओढवले नाही. मात्र, वारंवार बसणारे भूकंपाचे झटके मोठ्या भूकंपाची चाहूल असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.