Earthquake: हिमाचल प्रदेशात ४.१ तीव्रतेचा भूकंप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake

Earthquake: हिमाचल प्रदेशात ४.१ तीव्रतेचा भूकंप

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशच्या कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांना बुधवारी रात्री भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यांनंतर लोक घराबाहेर पळाले. अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद झालेली नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, रात्री 9 वाजून 21 मिनिटांनी हा भूकंप झाला. हा भूकंप ४.१ रिश्टर स्केलवर मोजण्यात आला. भूकंपाचा केंद्रबिंदू मंडीपासून २७ किमी वायव्येस ५ किमी खोलीवर होता.

हेही वाचा Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

तत्पूर्वी, बुधवारी सकाळी अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले होते. सकाळी 09 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास हे धक्के बसले. या भूकंपाचे धक्के रिश्टर स्केलवर ३.७ इतके होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, अरुणाचलमधील बसरपासून ५५ किमी खोलीवर १० किमी खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.