Video: "गुटखा खा, दारू प्या, थीनरचा वास घ्या पण..."; भाजपा नेत्याचं गजब वक्तव्य

देशात अनेक पक्षाचे नेते अनेक प्रकारची विधाने करतात
Video: "गुटखा खा, दारू प्या, थीनरचा वास घ्या पण..."; भाजपा नेत्याचं गजब वक्तव्य
Updated on

देशात अनेक पक्षाचे नेते अनेक प्रकारची विधाने करतात. अशातच भाजपच्या एका खासदाराने अजब-गजब असं वक्तव्य केलं आहे. रीवामध्ये जल संवर्धन संदर्भात एका शिबिर आयोजन करण्यात आलं होतं. या भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांच्या या अनोख्या व्यक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, "नदी, नाले आणि तलाव आटत आहेत. पाण्याची पातळी दरवर्षी घसरत चालली आहे. पाण्याचा अतीवापर वाढत असताना हे होणारच पण आपल्याला पाणी वाचवायचं आहे. जेव्हा पैसा खर्च होणार, तेव्हाच पाणी वाचणार. तुम्हाला हवं ते करा पण पाण्याची बचत करा" असं देखील जनार्दन मिश्रा यांनी म्हटलंय. याआधी मिश्रा यांनी हातांनी शौचालयाची सफाई करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता ते त्यांच्या या अनोख्या विधानामुळे पुन्हा चर्चेत आलेत.

Video: "गुटखा खा, दारू प्या, थीनरचा वास घ्या पण..."; भाजपा नेत्याचं गजब वक्तव्य
Election: हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुढे ते म्हणतात की, प्रत्येक ठिकाणी नदी, नाले आणि तलाव यातील पाणी आटत चालले आहे. पाणी वाचवलं पाहिजे. गुटखा खा, दारू प्या, थीनरचा वास घ्या किंवा आयोडेक्स खा. पण पाण्याचे महत्त्व समजून घ्या, आणि पाण्याची बचत करा", असं वक्तव्य जनार्दन मिश्रा यांनी केलं आहे. मिश्रा यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com