
मोफत सुविधांमुळे नव्हे मित्रांना फ्री लाभ दिल्याने आर्थिक संकट; 'आप'चा टोला
नवी दिल्ली : जनतेला मोफत सुविधा देऊन आर्थिक संकट येणार नाही, तर 'मित्रांना लाखो कोटी रुपयांचे मोफत लाभ देऊन' आर्थिक संकट येते, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. (arvind kejriwal news in Marathi)
हेही वाचा: लक्ष विचलित करण्यासाठी 'यंग इंडिया'चे कार्यालय सील; काँग्रेसचा आरोप
केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला की निवडणुकीपूर्वी घोषणांवर बंदी का? घोषणांमुळे आर्थिक संकट कसे काय येईल? मात्र घोषणा थांबवू नका, असेही ते म्हणाले. मात्र सरकारी अर्थसंकल्पातील एका भागापेक्षा जास्त रक्कम मोफत न देण्यावर विचार केला जाऊ शकतो, असं केजरीवाल यांनी म्हटलं.
दरम्यान केजरीवाल यांनी मोफत शिक्षणावर भर देताना म्हटलं की, आमच्या मुलांना मोफत चांगल शिक्षण मिळायला हव, प्रत्येक भारतीयांना चांगले उपचार मिळायलाच पाहिजे की, बँक लुटणाऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी, यावर देशाने विचार करायला हवा, असं आवाहनही केलं.
हेही वाचा: EDकडून 'यंग इंडियन लिमिटेड'चे कार्यालय सील; मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई
निवडणुकीदरम्यान मोफत वीज, पाणी किंवा अन्य सुविधा देण्याचे आश्वासन देण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका दाखवली आहे. निवडणुकीदरम्यान 'मोफत रेवाडी' वाटण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांना रोखण्यासाठी केंद्र सरकारला तोडगा काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. निवडणुकीच्या काळात 'रेवाडी संस्कृती' संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, फुकटची आश्वासने देणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करून निवडणूक चिन्ह जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.
Web Title: Economic Crisis Due To Giving Free Benefits To Friends Arvind Kejriwal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..