esakal | श्रावण-भाद्रपदात सहसा मंदी असतेच : मोदी 
sakal

बोलून बातमी शोधा

Recession

निवडणुकीत पराभूत झालेले मंदीच्या नावे ओरडत आहेत, असेही ते म्हणाले. मात्र, सुशील मोदींना मंदी दिसत नसेल, तर त्यात इतरांची काय चूक? त्यांचे विधान अभ्यासक्रमातच घ्यावे, असे झा यांनी नमूद केले. 

श्रावण-भाद्रपदात सहसा मंदी असतेच : मोदी 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पाटणा : "श्रावण-भाद्रपदात सहसा मंदी असतेच,' असे विधान केल्यामुळे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. आर्थिक मंदीबाबत आरडाओरड करून काही जण पराभवाच्या दुःखावर उतारा शोधू पाहत असल्याचेही सुशील मोदी म्हणाले. 

विरोधी नेत्यांनी मंदीच्या विधानावर टीका केली असून, "श्रावण-भाद्रपदात मंदी असतेच,' हे सुशील मोदींचे विधान अभ्यासक्रमातच घेतले पाहिजे, असा टोला राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार मनोज झा यांनी लगावला आहे. याच मोदींनी गुन्हेगारांना पितृपक्षात गुन्हे न करण्याचे आवाहन गेल्या वर्षी केले होते, याची आठवणही झा यांनी करून दिली. 
सुशील मोदी यांच्याकडे अर्थ मंत्रिपदही असून, त्यांच्या मते आर्थिक मंदी नसून, वाहन उद्योगावर त्याचा काही परिणाम झालेला नाही. आर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने उपाय जाहीर केले असून, आणखी काही उपाय लवकरच जाहीर होतील.

निवडणुकीत पराभूत झालेले मंदीच्या नावे ओरडत आहेत, असेही ते म्हणाले. मात्र, सुशील मोदींना मंदी दिसत नसेल, तर त्यात इतरांची काय चूक? त्यांचे विधान अभ्यासक्रमातच घ्यावे, असे झा यांनी नमूद केले. 

loading image
go to top