लॉकडाउनंतर अर्थव्यवस्था गतिशील; पाच राज्यांमध्ये व्यवहार मार्गावर येण्यास सुरुवात 

वृत्तसंस्था
Thursday, 4 June 2020

देशात २२मार्च रोजी लॉकडाउन जाहीर झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्यानंतर ते ३१मे पर्यंत वाढवत नेण्यात आले. पाचव्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल केले असून राज्यांचे आर्थिक व्यवहारही मार्गावर येत आहे.

नवी दिल्ली- कोरोनाव्हायरसमुळे देशात २२ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्यानंतर ते ३१ मे पर्यंत वाढवत नेण्यात आले. आता पाचव्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल केले असून राज्यांचे आर्थिक व्यवहारही मार्गावर येत आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे २७ टक्के योगदान असलेल्या पाच राज्यांची अर्थव्यवस्था लॉकडाउनच्या परिणामातून हळूहळू बाहेर येत आहे. ‘इलारा सिक्युरटीज इन्स.’ या संकेतस्थळाने बदलत्या स्थितीचे विश्‍लेषण केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पाच राज्ये 
केरळ, पंजाब, तमिळनाडू, हरियाना आणि कर्नाटक 

विश्‍लेषणाचा आधार 
विजेचा वापर 
वाहतूक 
घाऊक बाजारात कृषी शेतमालाची उपलब्धता 
गुगलवरील वाहतुकीबाबत माहिती 

विश्‍लेषण 
- पंजाब व हरियानात विजेच्या मागणीत सुधारणा. 
- शेतीच्या कामांसाठी विजेची मागणी 
- दिल्लीतही विजेची मागणी वाढली असून वाहतूकही वाढ 
- महाराष्ट्र, गुजरातसारख्या औद्योगिक राज्यांत कोरोनाचा प्रसार जास्त असल्याने आर्थिक व्यवस्थेत फारशी सुधारणा नाही 

ग्राहकांचा खर्च करण्याचा कल 
नवीन जीवनशैलीनुसार ग्राहकांचा खर्च करण्याचा प्राधान्यक्रम बदलला आहे का, याची चाचपणी मुंबईतील इलारा सिक्युरटीज’मधील अर्थतज्ज्ञ गरिमा कपूर यांनी गुगल सर्च ट्रेंडची पाहणी केली. कोरोनामुळे खरेदीचा कल काही प्रमाणात बदलला तरी आगामी महिन्यांत मागणी कायम राहील, असा अंदाज त्यांनी वर्तविला. 
- सलून, वातानुकूलन यंत्रे, विमान प्रवास, दुचाकी वाहने, धुलाई यंत्रे, व्हॅक्युम क्लिनर खरेदीसाठी प्रतीक्षा 
- पहिल्यांदा लॉकडाउन जाहीर झाल्यावर औषधे आणि किराणा माल यांना एकदम मागणी वाढली 
- कोरोनाच्या प्रतिबंधासाठी द्रवरूप साबणाला मागणी 
- लॉकडाउनमध्येही इअरफोन, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, मॉप, मायक्रोवेव्ह ओव्हन, खेळणी आणि केसांसाठीचे तेल आदींना मागणी 

अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणे हे भारतासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. देशात आर्थिक व्यवहारांत सुधारणा होत तरी सध्या ती धिमीच दिसत आहे. 
गरिमा कपूर, अर्थतज्ज्ञ, इलारा सिक्युरटीज, मुंबई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Economy dynamic after lockdown; Transactions in five states began