प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवलं सुंदर घरं; विश्वास बसत नाही? पाहा फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवलं सुंदर घरं; विश्वास बसत नाही? पाहा फोटो

प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवलं सुंदर घरं; विश्वास बसत नाही? पाहा फोटो

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जगात प्लास्टिक वाढल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्लॅस्टिक कचरा ही अशी गोष्ट आहे, जी लवकर विघटित होत नाही. वातावरणात दीर्घकाळ राहिल्यामुळे खूप नुकसान होते. त्यामुळे प्लास्टिक कमी करण्याबाबत सर्वत्र मोहीमा सुरू आहेत. विविध कंपन्या तसेच लोक आपापल्या स्तरावर प्लास्टिकच्या वापराला लगाम घालण्याचा प्रयत्न करत आहेत. इक्वेडोरमधील एका कंपनीने (इक्वाडोरची रिसायकलिंग कंपनी) या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. कंपनी प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून घरं बांधत आहे.

इक्वेडोर स्थित कंपनी इक्वाप्लास्टिक २००८ पासून प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरावर काम करत आहे. फर्निचर, दरवाजे, विटा इत्यादी स्वस्त वस्तू बनवण्यासाठी कंपनी दुधाची पाकिटे, रसाचे रिकामे बॉक्स आणि इतर प्लास्टिक कचऱ्याचा वापर करते. प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवलेल्या विटांच्या साहाय्याने घरंही बांधली जातात आणि त्यामध्ये लोक राहतातही...

कंपनीने आपले कार्यालय प्लास्टिक कचऱ्यापासून बनवले-

या टेट्रापॅकपासून बनवलेल्या गोष्टींवर लो कार्बन इम्पॅक्ट असतो. आश्चर्य म्हणजे याच प्लास्टिक आणि अॅल्युमिनियमच्या कचऱ्याचा वापर करून कंपनीने स्वतःचे कार्यालय बांधले आहे.

कंपनीने ३ लाख पेक्षा जास्त एक लिटरच्या दुधाची पाकिटे आणि ज्यूसच्या डबे वापरून आपले ९० चौरस मीटरचं ऑफिस बांधले आहेत. अॅल्युमिनियम आणि प्लास्टिकपासून बनवलेल्या या मटेरियलला इकोपॅक असे नाव देण्यात आले आहे.

दुध, ज्युसच्या टेट्रापॅकपासून बनविलं आकर्षक घर-

कंपनीने प्रथम कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून १२ लाख दुधाच्या डबे् गोळा केले आणि त्यांचे बारीक आकारात रूपांतर केले आणि नंतर त्यापासून घराची निर्मितीही केली. हे घर भूकंपरोधक आहे आणि अत्यंत तीव्र हवामानापासूनही संरक्षण करते. प्लास्टिक वापरून घर बांधण्याचा खर्चही कमी आहे आणि ते पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. घरांमध्ये वापरल्या जाणार्‍या इकोपोकपासून बनवलेल्या दरवाजांमध्ये ६९ किलो प्लास्टिक आणि अॅल्युमिनियमचा वापर केला जातो, तर जमिनीवर इकोपोकपासून बनवलेल्या बोर्डची किंमत फक्त ७४३ रुपये प्रति चौरस मीटर आहे.

loading image
go to top