माजी केंद्रीय मंत्र्यांवर ED ची मोठी कारवाई; 55 कोटींची बेनामी मालमत्ता जप्त I ED Action A Raja | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED action against A Raja

माजी केंद्रीय मंत्री ए राजा (A Raja) यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयानं (ED) मोठी कारवाई केलीये.

ED Action A Raja : माजी केंद्रीय मंत्र्यांवर ED ची मोठी कारवाई; 55 कोटींची बेनामी मालमत्ता जप्त

माजी केंद्रीय मंत्री ए राजा (A Raja) यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयानं (ED) मोठी कारवाई केलीये. ईडीनं ए राजा यांची 55 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त केली आहे.

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) कोईम्बतूर येथील त्यांची 45 एकर जमीन ईडीनं तात्पुरती जप्त केलीये. जप्तीच्या या कारवाईनंतर ईडीनं ए. राजा यांची संपत्ती बेनामी असल्याचं म्हटलंय. याप्रकरणी स्थानिक न्यायालयानं ए राजा यांना 10 जानेवारी 2023 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत.

हेही वाचा: Coronavirus : कोरोनाचा उद्रेक होताच कर्नाटक सरकार अ‍ॅक्शन मोडवर; 'मास्क'बाबत घेतला महत्वाचा निर्णय

2015 मध्ये ए राजा यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ए राजा हे 2004 ते 2007 या कालावधीत पर्यावरण आणि वन मंत्रालयात कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. 1999 मध्ये वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी ते एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाले. यानंतर त्यांनी केंद्रातील एनडीए आणि यूपीए या दोन्ही सरकारांमध्ये मंत्रीपदं भूषवली आहेत.

टॅग्स :Tamil NaduEDEd inquiry