ED चा चायनीज लोन अ‍ॅप्स कंपन्यांना दणका; 46.67 कोटी रुपये गोठवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paytm

EDचा चायनीज लोन अ‍ॅप्स कंपन्यांना दणका; 46.67 कोटी रुपये गोठवले

अंमलबजावणी संचालनालयाने चायनीज लोन अॅप प्रकरणात नुकत्याच टाकलेल्या छाप्यांनंतर विविध बँक खाती आणि EasyBuzz, Razorpay, Cashfree आणि Paytm च्या खात्यांमध्ये ठेवलेले 46.67 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. 14 सप्टेंबरला EDने बिहार, दिल्ली, गाझियाबाद,लखनौ,मुंबईसह इतर 6 ठिकाणी छापे टाकले होते.

तपासा दरम्यान या कंपन्यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम असल्याचे ED ला समजले. त्या माहिती नुसार, EasyBuzz Pvt Ltd (Pune) येथे एकूण 33.36 कोटी रुपये, Razorpay Software Pvt Ltd , बंगळुरू 8.21 कोटी, Cashfree Payments India Pvt Ltd, बंगळुरू 1.28 कोटी आणि Paytm पेमेंट्स सर्विसेस लिमिटेड नवी दिल्ली 1.11 कोटी रुपये गोठवण्यात आले आहे.

ईडीच्या निवेदनानुसार, या विविध बँक खाती आणि आभासी खात्यांनमधील सुमारे 46.67 कोटी रुपयांची गोठवण्यात आले. नागालँड पोलिसांनी गेल्या वर्षी नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात, ED मनी लाँड्रिंगची चौकशी करत आहे.

Web Title: Ed Action Chinese Loan Apps Paytm Easebuzz Razorpay Cashfree Crore Freezes India Pvt Ltd

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :EDED raidPaytm