National Herald Case : ‘नॅशनल हेरॉल्ड’मधून १४२ कोटी कमावले; सोनिया आणि राहुल गांधींसह अन्य आरोपींविरोधात ‘ईडी’चा दावा'
Money Laundering : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेते सोनिया आणि राहुल गांधी यांनी १४२ कोटींचा गुन्हेगारी स्वरूपाचा नफा कमावल्याचा ईडीचा आरोप आहे. या प्रकरणी हवाला प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता ईडीने न्यायालयात मांडली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नॅशनल हेरॉल्डच्या माध्यमातून १४२ कोटी रुपये कमावल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी विशेष न्यायालयात केला.