Amnesty Indiaला दणका! ईडीने दाखल केली तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amnesty India

Amnesty Indiaला दणका! ईडीने दाखल केली तक्रार

मुंबई : ईडीने आज Amnesty India विरूद्ध तक्रार दाखल केली आहे. मनी लॉन्ड्रिंग कायदा 2002 (PMLA) अंतर्गत ही तक्रार ईडीकडून दाखल करण्यात आली आहे. दरम्यान परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (FEMA) उल्लंघन केल्याप्रकरणी Amnesty India ला ५१ कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. तसेच Amnesty India चे माजी CEO आकार पटेल यांना १० कोटींचा दंड ठोठावला होता. त्यानंतर आता ईडीने Amnesty India विरोधात तक्रार दाखल केली आहे.

(Complaint File Against Amnesty India)

दरम्यान, ईडीने FEMA कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल Amnesty India आणि कंपनीच्या माजी CEO वर प्रत्येकी ५१ आणि १० कोटींचा दंड ठोठावला होता. त्यानंतर या दोघांनाही कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती. ईडीने पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीस मध्ये त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान ते २०१८ पासून ईडी आणि CBI च्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे.

त्यांना नोटीस पाठवल्यानंतर आता ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात Amnesty International India Pvt Ltd (AIIPL) आणि Indians for Amnesty International Trust (IAIT) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Ed File Complaint Against Amnesty India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeED
go to top