ED Raid Karti Chidambaram I कार्ती चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या, ईडीने दाखल केला गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karti chidambaram

सीबीआयनेनंतर आता ईडीनेही गुन्हा दाखल केला असल्याने कार्ती चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत

कार्ती चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या, ईडीने दाखल केला गुन्हा

मागील काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर व्यवहारांप्रकरणी सीबीआयने माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर मोठी कारवाई केली होती. चिनी नागरिकांना अनधिकृतरित्या पैसे घेऊन व्हिसा दिल्याचा आरोपामुळे चर्चेत असणारे कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता चिनी नागरिकांच्या व्हिसाप्रकरणी ईडीनेही गुन्हा नोंद केला असल्याने खळबळ पसरली आहे. (ED Raid Karti Chidambaram)

मागील काही दिवसांपूर्वी कार्ति चिदंबरम (karti chidambaram) यांच्याशी संबंधित ९ ठिकाणांवर सीबीआयने धाड टाकली होती. २५० चिनी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी ५० लाख लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. आज ईडीनेही कार्ती चिदंबरम यांच्यावर चीनी नागरिकांना व्हिसा पुरवल्याच्या घोटाळा प्रकरणात मनी लाँड्रिंगचा खटला दाखल केला आहे.

हेही वाचा: कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, निकटवर्तीयाला CBI कडून अटक

चिदंबरम यांच्या महत्वाच्या ९ ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय भास्कर रमणला व्हिजा भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयनं अटक केली होती. दरम्यान, यापूर्वीही लाखो रुपये घेऊन व्हिसा तयार करण्याच्या प्रकरणात सीबीआयनं कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित मालमत्तांवर कारवाई केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा भास्कर रमन यांची चौकशी करताना त्यांना ताब्यात घेतलं होतं. कार्ती चिदंबरम यांनी चिनी कंपन्यांमधील लोकांना आपली खास ओळख वापरुन व्हिसा दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.

हेही वाचा: तुफान पाऊस अन् बर्फवृष्टीमुळे केदारनाथ यात्रा थांबवली

मागील छाप्यादरम्यान, सीबीआयने यासंदर्भात कार्ती चिदंबरम आणि वडील पी. चिदंबरम यांच्या चेन्नई, मुंबई, तामिळनाडू, पंजाब, दिल्ली, ओरिसा येथील सुमारे 9 ठिकाणांवर छापे टाकले होते. सध्या कार्ती चिदंबरम यांची अनेक गुन्ह्यांशी संबंधित चौकशी सुरु आहे. यामध्ये एअरसेल-मॅक्सिस डील आणि INX मीडियाला 305 कोटी रुपयांचा परदेशी निधी प्राप्त करण्यासाठी विदेशी गुंतवणूक मंडळाच्या मंजुरीशी संबंधित अनेक गुन्हे प्रकरणांत अशांचा समावेश आहे.

Web Title: Ed Files Money Laundering Case Against Mp Karti Chidambaram Chinese Visa Scam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top