Amway India वर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त | Money Laundering Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amway

Amway India वर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) थेट विक्री करणारी ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री करणाऱ्या एमवे (Amway) इंडियाची 757 कोटी रुपयांची मालमत्ता मनी लाँडरिंग (Money Laundering Case) कायद्यांतर्गत जप्त केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील जमीन आणि कारखान्याची इमारत, प्लांट आणि मशिनरी, वाहने, बँक खाती आणि मुदत ठेवी यांचा समावेश आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणांतर्गत ईडीने केलेल्या तपासात एमवे डायरेक्ट सेलिंग मल्टीलेव्हल नेटवर्कच्या नावाखाली पिरॅमिड फसवणुकीत सामील असल्याचे उघड झाले आहे. (ED Action On Amway India)

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत संलग्न केलेल्या एकूण 757.77 कोटी रुपयांच्या मालमत्तेपैकी 411.83 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे, तर शिल्लक रक्कम 345.94 कोटी रुपये एमवेच्या 36 बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. फेडरल एजन्सीने कंपनीवर मल्टी-लेव्हल मार्केटिंग 'घोटाळा' केल्याचा आरोप केला आहे जेथे कंपनीने ऑफर केलेल्या बहुतेक उत्पादनांच्या किमती खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रतिष्ठित उत्पादकांच्या पर्यायी लोकप्रिय उत्पादनांच्या तुलनेत खूपच जास्त होत्या, असे तपास संस्थेने म्हटले आहे.

2002-03 ते 2021-22 या कालावधीत कंपनीने व्यवसायातून एकूण 27,562 कोटी रुपये गोळा केले आणि यापैकी 7,588 कोटी रुपये भारत आणि यूएसमधील वितरक आणि सदस्यांना पेमेंट म्हणून केले असून, फेडरल एजन्सीने कंपनीवर मल्टी-लेव्हल मार्केटिंग घोटाळाचा आरोप केला आहे.

हेही वाचा: पुलवामा हल्ल्यात सहभागी जौशचा कमांडर दहशवादी घोषित

कारवाई 2011 मधील प्रकरणातील

दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर कंपनीकडून ईडीची ही कारवाई 2011 च्या तपासाशी संबंधित असल्याचे म्हटले असून, तेव्हापासून कंपनी एजन्सीला सहकार्य करत आहे. त्याशिवाय वेळोवेळी मागितलेली सर्व माहिती शेअर केल्याचेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कंपनी भारतातील सर्व कायदे आणि नियमांचे पालन करत असल्याचे सांगतिले आहे.

Web Title: Ed Has Provisionally Attached Assets Worth Rs 75777 Crore Belonging To Amway India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ED